संधी नोकरीच्या

Last Updated: Jun 01 2020 8:21PM
Responsive image


महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये 20 - महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट फेलोज पदाकरिता प्रथमश्रेणी एमबीए किंवा बीई/बीटेक उमेदवारांकडून 10 जून 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. अधिक माहिती  midcindia.org येथे उपलब्ध.

इंडियन ऑईलमध्ये 600 अप्रेंटिस यामध्ये टेक्निशियन, ट्रेड अप्रेंटिस पदाकरिता 20 जून 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात iocl.com येथे उपलब्ध.

अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीमध्ये जिल्हा व्यवस्थापक पदांच्या भरतीसाठी कृषिसंबंधित पदवी 60 टक्के व अनुभव उमेदवाराकडून 7 जून 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत असून सविस्तर जाहिरात aicofindia.com येथे उपलब्ध. 

ठाणे महानगरपालिकामध्ये परिचारिका, इन्टेसोव्हिस्ट, प्रसाविका व वैद्यकीय अधिकारी पदासाठी 7 जून 2020 पर्यंत अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात thanecity.gov.in येथे उपलब्ध.

बॉडकास्ट इंजिनिअरिंगमध्ये 464 मल्टी टास्किंग पदासाठी आठवी पास व अनुभवी उमेदवाराकडून 15 जून 2020 पर्यंत अर्ज मागविणेत येत असून सविस्तर जाहिरात becil.com येथे उपलब्ध.
 महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात लवकरच 17 हजार पदांची संभाव्य भरती होणार आहे.

भारतीय सुरक्षा व विनिमय मंडळ सेबी - 147 असिस्टंट मॅनेजर यामध्ये जनरल, लिगल, आयटी, इंजिनिअर्स व रिसर्च पदाकरिता संबंधित पदवी/पदव्युत्तर पदवी उमेदवाराकडून 31 जुलै 2020 
पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात sebi.gov.in येथे उपलब्ध.

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन 114 अप्रेंटीस पदामध्ये एच.आर., डिप्लोमा व इंजिनिअरिंग पदवी पदाकरिता 14 जून 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात powergridindia.com  येथे उपलब्ध.

- संकलन : ज्ञानदेव भोपळे