Thu, Jan 28, 2021 07:57होमपेज › Edudisha › MPSC 2020 : राज्यशास्त्र

MPSC 2020 : राज्यशास्त्र

Last Updated: Feb 11 2020 1:24AM
प्रा. सुजित गोळे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2020 मध्ये घेण्यात येणार्‍या स्पर्धा परीक्षांसाठी ‘राज्यशास्त्र’ हा विषय अतिशय महत्त्वपूर्ण आहे. एक अधिकारी म्हणूनच नव्हे, तर एक सुजाण नागरिक म्हणूनदेखील आपल्याला  जीवन जगण्यासाठी, आपले हक्क, कर्तव्ये इ. साठी आपल्या देशाने एक चौकट ठरविली आहे त्यामध्ये विविध संस्थांचा, तत्त्वांचा, हक्कांचा व इतर बर्‍याच गोष्टींचा समावेश होतो,याचा ‘राज्यशास्त्र’मध्ये समावेश होतो.

परीक्षेतील मागणी व महत्त्व :

सदर विषय हा MPSC मार्फत घेण्यात येणार्‍या बहुतांश परीक्षांमध्ये समाविष्ट झालेला दिसतो. त्यामुळे विषयाचे महत्त्व तितकेच वाढते. अगदी राज्यसेवा परीक्षेला पूर्व व मुख्यमधील GS-2 हा संपूर्ण पेपर यावर आधारित आहे. तसेच संयुक्त पूर्व परीक्षा व इतर परीक्षांसाठीदेखील यावर प्रश्न विचारतात. या विषयाचा अभ्यास करताना जर व्यापक दृष्टिकोन ठेवल्यास या सर्व परीक्षांसाठी आपणास भरपूर फायदा होतो.

अभ्यासक्रम व तयारीची रणनिती : 

यामध्ये भारताचे संविधान, राजकीय यंत्रणा (शासनाची रचना, अधिकार, कार्ये) केंद्र सरकार, संसद, न्यायमंडळ, राज्य सरकार (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ), जिल्हा प्रशासन ग्रामीण व नागरी स्थानिक शासन, शिक्षण पद्धती, पक्ष आणि दबाव गट, प्रसार माध्यमे, निवडणूक प्रक्रिया प्रशासनिक फायदा, केंद्राचे व राज्याचे विशेषाधिकार, पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1886, ग्राहक संरक्षण अधिनियम 1986, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, अनुसूचित जाती, जनजाती अधिनियम 1989, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, समाजकल्याण सामाजिक विधिविधान, सार्वजनिक सेवा, सरकारी खर्चावर नियंत्रण इ. ठळक गोष्टींचा समावेश होतो.

उमेदवारांनी सर्वप्रथम मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या आधारे प्रश्नांचे विश्लेषण करावे. तद्नंतर अभ्यासक्रम समजावून घ्यावा. या दोन गोष्टी व्यवस्थितरित्या झाल्यानंतरच संदर्भसाहित्यांची निवड करावी. अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर प्रत्येक मुद्दा क्रमशः वाचावा.  त्यानंतर कलम 1 ते 51 यांचा विश्लेषणात्मक अभ्यास करावा. या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे उमेदवारांनी केंद्र व राज्य शासनाचा अभ्यास तुलनात्मकरित्या करावा. उदा. पंतप्रधान अभ्यासल्यास लगेचच मुख्यमंत्री अभ्यासावे.

राष्ट्रपती, राज्यपाल, लोकसभा, विधानसभा, राज्यसभा, विधान परिषद अशा प्रकारच्या अभ्यासामुळे परीक्षेवेळी होणार्‍या चुका पूर्णतः कमी होतात. अंतिम टप्प्यात उमेदवारांनी वेळ लावून जास्तीत जास्त बहूपर्यायी प्रश्नांचा सराव करावा. अशाप्रकारे अभ्यास केल्यास जास्तीत जास्त गुण  प्राप्त होतील.