Sun, Jan 17, 2021 06:20
MPSC त परीक्षेच्या संधीवर मर्यादा

Last Updated: Jan 12 2021 2:22AM
प्रा. सुजित गोळे

नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात चझडउ मार्फत एक मोठा निर्णय घेण्यात आला. तो म्हणजे विभिन्‍न स्पर्धा परीक्षांसाठी उमेदवारांच्या प्रयत्नांची / संधीची संख्या मर्यादित करण्यात आली असून त्याची कमाल मर्यादा ही वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी भिन्‍न आहे. या निर्णयानंतर बर्‍याच उमेदवारांच्या मनामध्ये बरेच अनुत्तरित प्रश्‍न निर्माण झालेत. याचा नेमका अर्थ कसा लावावा?

सर्वप्रथम आपण हा निर्णय नेमका काय आहे हे समजावून घेऊया. त्यानंतर त्यावरील विविध पैलूंची चर्चा करूया. महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत असणार्‍या विविध विभागांमधील वेगवेगळी पदे भरण्यासाठी MPSC मार्फत स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. आतापर्यंत या स्पर्धा परीक्षा अर्हताप्राप्‍त उमेदवार परीक्षेच्या कमाल वयोमर्यादेपर्यंत कितीही वेळा देत असत. मात्र आता या निर्णयामुळे उमेदवारांच्या याच प्रयत्नांच्या संख्येवर मर्यादा पडलेली आहे, ती नेमकी कशी आहे ते बघूया. • ही मर्यादा समजावून घेण्यासाठी आयोगाने सर्व उमेदवारांचे तीन गटांत वर्गीकरण केले आहे.

1) खुला/अराखीव उमेदवारांसाठी कमाल ‘सहा’ संधी उपलब्ध राहतील. 2) अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही संधीची कमाल मर्यादा लागू नसेल. म्हणजेच SC व ST प्रवर्गातील उमेदवार परीक्षेच्या कमाल वयोमर्यादेपर्यंत कितीही वेळा परीक्षा देऊ शकतात. 3) उर्वरित मागास प्रवर्ग म्हणजे वरील दोन्ही गटातील उमेदवारांव्यतिरिक्‍त सर्व उमेदवार यांच्यासाठी कमाल ‘नऊ’ संधी उपलब्ध राहतील.

• वरील संधींची संख्या मोजण्यासाठी पुढील निकष वापरले जातील.

अ) उमेदवाराने पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास संधी समजली जाणार.
ब) पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरला उपस्थिती असल्यास संधी समजली जाणार.
क) कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र किंवा उमेदवारी रद्द झाल्यास तरीही संधी समजली जाणार.

• तुमच्या मनातील प्रश्‍न आणि त्यांची उत्तरे ः प्रस्तुत निर्णय व उमेदवारांची सद्य:स्थिती :
स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार हे वेगवेगळ्या तयारीच्या टप्प्यांमध्ये असतात. काही नवीन तयारीला सुरुवात करणारे तर काही तीन-चार वर्षे. काहींनी यापूर्वी बर्‍याच वेळा परीक्षा दिलेली आहे, तर मग या निर्णयाचा परिणाम नेमका काय : सदर निर्णय हा सन 2021 मध्ये व त्यापुढील प्रसिद्ध होणार्‍या जाहिरातींसाठीच्या परीक्षांना लागू असल्याकारणाने यापूर्वी दिलेल्या परीक्षांसाठीच्या संधी ग्राह्य धरल्या जाणार नसून इथून पुढे या संधी मोजल्या जातील.

• चझडउ च्या विभिन्‍न स्पर्धा परीक्षा व संंधीची संख्या : चझडउ मार्फत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात व एकच उमेदवार बर्‍याच परीक्षांसाठी पात्र असू शकतो. तर मग संधीची संख्या प्रत्येक परीक्षेसाठी वेगवेगळी मोजली जाणार का? तर होय. उदा. A या अराखीव गटातील उमेदवारासाठी राज्यसेवा या परीक्षेसाठी एकूण सहा संधी तसेच PSI/STI/ASO साठीदेखील सहा संधी असणार.

• पूर्व परीक्षा अर्ज व संधींची संख्या ः पूर्व परीक्षेचा अर्ज भरला, मात्र पूर्व परीक्षेच्या कोणत्याच पेपरला उमेदवार उपस्थित राहिला नसल्यास संधी समजली जाईल का?
आयोगाकडून या बाबतीतील कोणताही खुलासा देण्यात आलेला नाही. मात्र MPSC मार्फत घेतली जाणारी JMFC परीक्षेसाठी काही वर्षांपूर्वी याच प्रकारची कमाल संधींची रचना होती व त्या परीक्षेच्या पूर्व टप्प्यावरील पेपरला अनुपस्थिती असल्यास ती संधी समजली जात नसे. त्यामुळे अशाच प्रकारची रचना आयोगाकडून या परीक्षांना राबविली जाईल, अशी आशा व्यक्‍त करू.

• कमाल वयोमर्यादा व संधी कमाल मर्यादा : या ठिकाणी दोन निकष आहेत. 1) कमाल वयोमर्यादा संपल्यामुळे उमेदवार परीक्षेतून बाद होणे तर 2) संधीची कमाल मर्यादा संपल्यामुळे. दोन्हीपैकी जो निकष सर्वप्रथम पूर्ण होईल त्याचक्षणी तो उमेदवार परीक्षेमधून बाद होईल.