Wed, Sep 18, 2019 21:13होमपेज › Edudisha › संधी नोकरीच्या

संधी नोकरीच्या

Published On: Sep 10 2019 1:21AM | Last Updated: Sep 10 2019 1:21AM
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये - 533 विविध मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह, ऑफिसर, आयटी, सिक्युरिटी, आर्किटेक्चर, विविध इंजिनियर्स व एक्सपर्ट पदांकरिता 23 सप्टेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात sbi.co.in/careers/ येथे उपलब्ध.

आर्मी पब्लिक स्कूलमध्ये 8000 शिक्षकांची भरतीकरिता पदवी 50 टक्के व बीएड उमेदवारांकडून 21 सप्टेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात aps-csb.in/College/Index New.aspx येथे उपलब्ध.

एमएमआरडीएमध्ये 1053 विविध अभियंता, तंत्रज्ञ, सहायक पदांसाठी 7 ऑक्टोबर 2019 पर्यंत अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात mmrda.maharashtra.gov.in येथे उपलब्ध.

•इंजियरिंग इंडियामध्ये विविध एक्झिक्युटिव्ह पदांसाठी 23 सप्टेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात engineersindia.com येथे उपलब्ध.

सार्वजनिक आरोग्य विभागात 153 आरोग्य अधिकारी पदांकरिता 25 सप्टेंबर 2019 पर्यंत अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात arogya.maharashtra.gov.in येथे उपलब्ध.

महाराष्ट्र शासनामार्फत घेणेत येणारी हजारो पदांची पोलिस शिपाई भरतीसाठी 23 सप्टेंबर 2019 पर्यंत 12 वी पास उमेदवारांकडून अर्ज मागविणेत येत असून प्रथम लेखी परीक्षा ऑनलाईन स्वरूपात होणार व त्यानंतर शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. अधिक माहिती mahapariksha.gov.in येथे पाहावयास मिळेल.

मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन 256 अकौटंट, टेक्निशियन, मेकॅनिस्ट, स्टेनो, असिस्टंट व इतर पदासाठी 21 सप्टेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात mecl.co.in/careers.aspx येथे उपलब्ध.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 221 अधिकारी, बँक सहायक पदांसाठी पदवी प्राप्त उमेदवारांकडून 21 सप्टेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात mdccbank.com येथे उपलब्ध.

कर्मचारी निवड समितीमार्फत ज्युनि. व सिनियर ट्रान्सलेटर व हिंदी प्राध्यापक पदांसाठी 26 नोव्हेंबर 2019 रोजी परीक्षा असून 26 सप्टेंबर 2019 पर्यंत ऑनलाईल अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात ssc.nic.in येथे उपलब्ध.

भारतीय लेखा परीक्षा व लेखा विभागात 182 लेखापाल व क्लार्क (खेळाडू) पदांच्या भरतीकरिता 30 सप्टेंबर 2019 पर्यंत ऑफलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. अधिक माहिती cag.gov.in येथे उपलब्ध.

स्टेट बँकमध्ये मेडिकल ऑफिसर पदांकरिता एमबीबीएस पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज 19 सप्टेंबर 2019 पर्यंत मागविणेत येत आहेत. अधिक माहिती sbi.co.in/careers येथे उपलब्ध.

ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिट्यूट टेस्ट - गेट परीक्षा - 1 फेब्रुवारी 2020 ते 9 फेब्रुवारी 2020 पर्यंत या कालावधीत होणार असून इंजिनियरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी धारकांकडून ऑनलाईन अर्ज 24 सप्टेंबर 2019 पर्यंत मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात gate.iitd.ac.in येथे उपलब्ध.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी - सन 2019 व सन 2020 चे विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर - परीक्षा -एमबीए, नेट, सीएसआयआरनेट, सी मॅट, जी पॅट, ऑल इंडिया आयुष पदव्युत्तर एन्ट्रन्स टेस्ट, इग्नो- बी एड, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट, जवाहर नेहरू युनि. एन्ट्रन्स टेस्ट, दिल्ली युनि. एट्रन्स टेस्ट, नीट इ. परीक्षांचे 2019 व 2020 वेळापत्रक प्रसिद्ध. अधिक माहिती nta.ac.in येथे पहावी.

यूजीसी नेट - परीक्षा - 2 डिसेंबर 2019 ते 6 डिसेंबर 2019 पर्यंत या कालावधीत ऑनलाईन होणार असून पदव्युत्तर पदवी/बसलेले उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज 9 ऑक्टोबर 2019 पर्यंत मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात पींर.रल.ळप येथे पहावी.

सैन्य भरती कोल्हापूर - ठिकाण - रत्नागिरी - रजिस्ट्रेशन - 22 सप्टेंबर 2019 ते 5 ऑक्टोबर 2019 - भरती - 21 नोव्हेंबर 2019 ते 30 नोव्हेंबर 2019 - सहभागी जिल्हे - कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी - सदर महिती संभाव्य दिलेली आहे.

 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत हजारो ज्युनि. इंजिनियर्स पदासाठी संबंधित डप्लोमाधारककडून ऑनलाईन अर्ज 12 सप्टेंबर 2019 पर्यंत मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात ssc.nic.in येथे उपलब्ध.

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सीटीईटी - 8 डिसेंबर 2019 रोजी होणार असून डीएड/बीएड उमेदवाराकंडून ऑनलाईन अर्ज 18 सप्टेंबर 2019 पर्यंत मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात ctet.nic.in येथे उपलब्ध.

संकलन - ज्ञानदेव भोपळे