प्रा. सुजित गोळे
या परीक्षेमार्फत केंद्र शासनाच्या गृह विभागाच्या अंतर्गत येणारे IB अर्थातच इंटेलिजन्स ब्युरो विभागातील ACIO Grade II असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर या पदांची भरती करण्याचे नियोजित आहे.
भारतीय गुप्तचर विभाग हा जगातील सर्वोत्तम गुप्तचर विभागांपैकी आहे. खइ मध्ये काम करणे हे प्रतिष्ठेचे मानले जाते. म्हणूनच आपल्यासाठी ही एक सुवर्णसंधीच आहे. या परीक्षेची जाहिरात डिसेंबर 2020 मध्ये प्रसिद्ध झाली असून, तिची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करणे गरजेचे असून त्याचा अंतिम दिनांक हा 9 जानेवारी 2021 आहे. अर्ज करण्यासाठी तसेच महत्त्वाच्या माहितीसाठी पुढील संकेतस्थळांचा वापर करू शकता -
1) https://www.mha.gov.in
2) https://ncs.gov.in
शैक्षणिक अहर्ता - या परीक्षेला पात्र होण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही शाखेची पदवी संपादन करणे अनिवार्य आहे. याच्याच जोडीला उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञानदेखील असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा - ठराविक वयामधीलच उमेदवार या परीक्षेसाठी पात्र असतात व ही वयोमर्यादा संवर्गनिहाय वेगवेगळी असते ती पुढीलप्रमाणे -
* खुला गट = कमीत कमी 18 ः जास्तीत जास्त 27 वर्षे
* OBC गट = कमीत कमी 18 ः जास्तीत जास्त 30 वर्षे
* SC/ST गट = कमीत कमी 18 ः जास्तीत जास्त 32 वर्षे
रिक्त जागा व संवर्गनिहास विश्लेषण -
प्रस्तुत परीक्षेमार्फत ACIO Grade - II या पदाच्या एकूण 2000 जागा भरावयाच्या असून त्यांचे संवर्गनिहाय तपशील पुढीलप्रमाणे -
खुला - 989; OBC - 117; SC - 360; ST - 121; EWS परीक्षा केंद्र - उमेदवारांना अर्ज दाखल करतेवेळी स्वतःच्या आवडीची किंवा सोयीच्या दिलेल्या केंद्रांमधून तीन केंद्रांचा पर्याय द्यावयाचा आहे. एकदा निवडलेल्या केंद्रांचा पर्याय द्यावयाचा आहे. एकदा निवडलेल्या केंद्रात पुन्हा बदल करता येत नसल्याने तो काळजीपूर्वक निवडावा. संबंधित परीक्षेच्या टप्पा 1 यासाठी महाराष्ट्राच्या संदर्भात पुढील परीक्षा केंद्रांचा वापर उमेदवारांसाठी दिलेला आहे.
* अमरावती, औरंगाबाद, नागपूर, मुंबई, पुणे, नांदेड, नाशिक.
परीक्षेची रचना - प्रस्तुत परीक्षा ही तीन टप्प्यांमध्ये घेतली जाणार असून, तिन्ही टप्प्यांचे गुण एकत्रितपणे अंतिम निवडीसाठी ग्राह्य धरले जातात.
टप्पा 1
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाचा हा टप्पा असून यासाठी 100 प्रश्न 100 गुणांसाठी विचारतात. प्रत्येक 4 चुकीच्या प्रश्नांना एका बरोबर प्रश्नाचे गुण वजा केले जातात. अशा प्रकारची नकारात्मक गुणपद्धत राबविली जाते. ही परीक्षा ऑनलाईन माध्यमातून देणे बंधनकारक आहे. एकूण जागांच्या 10 पट विद्यार्थी या टप्प्यातून पुढील टप्प्यास पात्र होतात.
पुढील पाच विभागांचे मिळून 100 प्रश्न असतात.
1) General Awareness 2) General Studies 3) Quantitative Aptitude 4) Logical Reasoning 5) English Language
टप्पा 2
हा टप्पा वर्णनात्मक स्वरूपाचा असून निबंध व आकलन यावरील माहिती उमेदवारांना लिहावी लागते. यासाठी एकूण 50 गुण दिले जातात.
टप्पा 3
या टप्प्यात एकूण 100 गुणांची मुलाखत घेतली जाते. उमेदवाराचे इतर पैलू तपासण्याचे काम या टप्प्यात केले जाते. तिन्ही टप्पे उमेदवाराने पार केल्यानंतर त्याच्या गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाते. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना भारतात कोठेही काम करण्याची संधी प्राप्त होते.