Mon, Aug 03, 2020 15:00होमपेज › Edudisha › दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग

दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग

Last Updated: Jan 18 2020 1:33AM
प्रा. सुजित गोळे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2020 मध्ये ज्या विविध परीक्षा घेतल्या जाणार आहेत, त्यापैकी एक महत्त्वाची परीक्षा म्हणजे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग (JMFC) सदर परीक्षा ही विधी शाखेतील पदवीधर उमेदवारांना देता येते. त्यासाठी विशिष्ट अर्हता उमेदवाराकडे असणे अनिवार्य असते. नुकतीच या परीक्षेसाठी असणार्‍या पूर्व परीक्षेची जाहिरात MPSC  ने प्रसिद्ध केली. सदर 2020 मधील परीक्षेमार्फत एकूण 74 पदे भरली जाणार असून त्यामध्ये आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतो. 

यासाठीच्या पूर्व परीक्षेचा दिनांक हा 1 मार्च 2020 हा असून मुख्य परीक्षा ही अंदाजे 14 जून 2020 या दिवशी नियोजित आहे. पूर्व परीक्षा महाराष्ट्रातील मुंबई, औरंगाबाद व नागपूर या परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल. आजच्या या लेखातून आपण या परीक्षेच्या टप्प्यांविषयी, अर्हतेविषयी व इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर नजर टाकणार आहोत. सदर परीक्षा ही पुढील तीन टप्प्यांत राबविली जाते.

टप्पा - 1) पूर्व परीक्षा - 100 गुण, टप्पा - 2) मुख्य परीक्षा - 200 गुण, टप्पा - 3 ) मुलाखत - 50 गुण.  टप्पा 1) पूर्व परीक्षा - 100 गुण ः

पूर्व परीक्षेचा मुख्य उद्देश हा उमेदवारांची संख्या मर्यादित करण,े हा असून त्यासाठी गुणवत्तेनुसार एकूण पदसंख्येच्या 10 पट उमेदवार ‘पूर्व’ मधून ‘मुख्य’ परीक्षेसाठी निवडले जातात. म्हणजेच पूर्व परीक्षा ही एक प्रकारची चाळणी परीक्षा असते. त्यामुळे या परीक्षेमधील गुण अंतिम निवडीसाठी ग्राह्य धरले जात नाहीत.

• परीक्षा स्वरूप : पूर्व परीक्षेसाठी एकूण एकच प्रश्‍नपत्रिका, 100 प्रश्‍न हे 100 गुणांसाठी विचारतात. प्रश्‍नांचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असून माध्यम हे फक्‍त इंग्रजी असते. उमेदवारांना हे 100 प्रश्‍न 2 तासांमध्ये सोडविणे अनिवार्य असते. प्रत्येक योग्य उत्तराला 1 गुण व प्रत्येकी चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा केले जातात.

• पूर्व परीक्षा अभ्यासक्रम : कोड ऑफ क्रिमीनल प्रोसिजर, सिव्हील प्रोसिजर कोड, एव्हिडन्स अ‍ॅक्ट, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अ‍ॅक्ट, स्पेसिफिक रिलीफ अ‍ॅक्ट, महाराष्ट्र रेंट कंट्रोल अ‍ॅक्ट, लिमिटशन अ‍ॅक्ट, कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया, इंडियन पिनल कोड, लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट, सेल ऑफ गुडस् अ‍ॅक्ट अ‍ॅण्ड पार्टनरशिप अ‍ॅक्ट.
टप्पा 2 ) मुख्य परीक्षा 200 गुण

मुख्य परीक्षेचा मूळ उद्देश हा उमेदवारांचे ज्ञान तपासणे हे असते. सदर पदासाठीची मुख्य परीक्षा ही पारंपरिक/वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची असून यासाठी दोन अनिवार्य प्रश्‍नपत्रिका असतात. प्रत्येक प्रश्‍नपत्रिका ही 100 गुणांसाठी तीन तासांत सोडविणे अनिवार्य असते. मुख्य परीक्षेचे माध्यम हे इंग्रजी किंवा मराठी असते. उमेदवारांनी अर्ज करतेवेळीच हे माध्यम निवडणे गरजेचे असते. एकदा निवडलेले माध्यम बदलता येत नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. मुख्य परीक्षा ही मुंबई, औरंगाबाद व नागपूर या केंद्रांवर घेण्यात येते. मुख्य परीक्षेमधून एका पदासाठी तीन उमेदवार मुलाखतीसाठी निवडले जातात. मात्र, याच बरोबरीत प्रत्येक पत्रिकेमध्ये किमान 50% गुण मिळविणे अनिवार्य असते, तर मागास जातीमधील उमेदवारांसाठी ही मर्यादा 45% असते.  टप्पा 3) मुलाखत - 50 गुण

मुलाखतीचा हेतू हा उमेदवाराचे कायद्याचे ज्ञान, आकलन, तर्कशुद्ध निर्णयक्षमता, संवाद, चारित्र्य, मानसिकता, दृष्टिकोन नीतीतत्त्वे, आवड यांच्या मूल्यमापनातून पदासाठीची योग्यता ठरविणे असते. उमेदवाराला या टप्प्यात किमान 40% गुण मिळविणे गरजेचे असते. अन्यथा अंतिम निवडीमध्ये त्या उमेदवाराचा विचार केला जात नाही.

• पात्रता : वयाच्या पात्रतेसाठी 3 जानेवारी 2020 रोजी किमान व कमाल वय विचारात घेतले जाईल.

1) नवीन विधी पदवीधर : किमान वय - 21 वर्ष, कमाल वय - अमागास - 25, मागासवर्गीय - 30.
विधी शाखेतील पदवी प्रत्येक परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण. LL.B/LL. चे शेवटचे वर्ष किमान 55% गुणांनी उत्तीर्ण.

2) वकील, अ‍ॅटर्नी किंवा अधिवक्‍ता : किमान वय 21, कमाल - अमागास - 35, मागासवर्गीय 40. विधी शाखेतील पदवी तसेच मुंबई उच्च न्यायालय किंवा त्यास दुय्यम असलेल्या न्यायालयात 3 वर्षांचा अनुभव.

3) सेवा कर्मचारी : किमान वय - 21, कमाल - अमागास - 45, 
मागास - 50 विधी शाखेतील पदवी व 3 वर्षांचा अनुभव असावा. 
अशा प्रकारे योग्य दिशेने अभ्यास केल्यास यशप्राप्‍ती होऊ शकते.