Sat, Jan 23, 2021 07:28होमपेज › Edudisha › बारावीनंतर...

बारावीनंतर...

Last Updated: Nov 05 2019 12:51AM
जगदीश काळे

बारावीनंतर योग्य अभ्यासक्रम किंवा फॅकल्टी निवडणे सोपे काम नाही. कोणता अभ्यासक्रम निवडावा, कोणत्या संस्थेत प्रवेश घ्यावा याबाबत अनेक प्रश्‍न पालकांना आणि मुलांना पडत असतात. सध्याच्या काळात पदवी आणि पदव्युत्तर पदवी या पारंपरिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्‍त अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम देखील उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमाच्या मदतीने करिअरला दिशा देऊ शकतो. भावनेच्या भरात किंवा स्पर्धा म्हणून अभ्यासक्रमाची निवड करणे नुकसानकारक ठरू शकते.  

कॉमर्स आणि मॅनेजमेंट

वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी बी.कॉम. व्यतिरिक्‍त बीबीए हा पदवी अभ्यासक्रम उपयुक्‍त ठरू शकतो. बी.कॉम. ऑनर्स, बी.कॉम. टॅक्सेक्शन, बी.कॉम. कॉम्प्युटर, बी.कॉम. फॉरेन ट्रेड या प्रमुख अभ्यासक्रमांचा उल्लेख करावा लागेल. याशिवाय वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना कॉमर्स आणि मॅनेजमेंट आधारित विविध अभ्यासक्रमांची देखील सहजपणे निवड करता येऊ शकते. चार्टर्ड अकाऊंटन्सी, बॅचलर इन कॉमर्स, बॅचलर इन फायनान्शियल अँड इन्व्हेस्टमेंट अ‍ॅनालिसिस, बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए), मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए), बॅचलर इन हॉटेल मॅनेजमेंट, बॅचलर इन इकोनॉमिक्स, बॅचलर इन इव्हेन्ट मॅनेजमेंट, बॅचलर इन रिटेल मॅनेजमेंट, बॅचलर इन स्टॅटटिक्स, कंपनी सेक्रेटरी कोर्स, बॅचलर ऑफ बिझनेस स्टडिज, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट (बीएमएस), बॅचलर इन फायनान्शियल अकाऊंटिंग आदींचा उल्लेख करता येईल. 

लॉ (विधि अभ्यासक्रम)

कायद्याच्या क्षेत्रात करिअर करण्याच्या द‍ृष्टीने आज विद्यार्थ्यांना खूपच संधी आहे. कायद्याच्या विविध क्षेत्रांत जसे की सिव्हिल लॉ, लेबर लॉ, अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह इंटरनॅशनल लॉ, पेटेंट लॉ, टॅक्स लॉ, लेबर लॉ, अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ आदी क्षेत्रांत प्रावीण्य मिळवून रोजगार मिळवू शकता. कायद्याच्या कोणत्याही क्षेत्रात करिअरसाठी एलएलबीची पदवी अनिवार्य आहे. काही वर्षांपूवी पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाची निर्मिती झाली आणि हा अभ्यासक्रम विशेषत: बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्‍त आहे. याशिवाय एलएलबीच्या पदवीबरोबरच अनेक शिक्षण संस्था कायदेविषयक अभ्यासक्रम शिकवण्याचे काम करत आहेत. हे अभ्यासक्रम डिप्लोमा कोर्सच्या रुपातूनही संचलित केले जातात. यानुसार इंटरनॅशनल लॉ, सायबर लॉ, पेटंट अँड कॉपिराईट लॉ, लेबर आणि टॅक्स लॉ या डिप्लोमा कोर्सला अधिक मागणी आहे. 

आर्टस् आणि ह्युमेनिटिज :

बारावीचा कोणत्याही शाखेचा विद्यार्थी हा बीए पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो. इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इंग्रजी साहित्य, राज्यशास्त्र, मनोविज्ञान, भूगोल, हिंदी साहित्य आदी करिअरच्या द‍ृष्टीने उपयुक्‍त अभ्यासक्रम आहेत. 

• बायोलॉजी (जीवशास्त्र): 

बायोलॉजी विषयासह बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील अभ्यासक्रम आहेत. बॅचलर ऑफ मेडिसन अँड बॅचलर ऑफ सर्जरी (एमबीबीएस), बॅचलर ऑफ होमिओपॅथी मेडिसिन अँड सर्जरी (बीएचएमएस), बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी (बीएएमएस), बॅचलर ऑफ युनानी मेडिसन अँड सर्जरी (बीयूएमएस), बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (बीडीएस), बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स (बीव्हीएमएस), बीएससी इन बॉटनी, बीएससी इन जुओलॉजी, बीएससी इन एन्थ्रोपोलॉजी, बीएससी इन होम सायन्स, बीएससी इन जेनेटिक्स, बीएससी इन मायक्रोबायोलॉजी, बीएससी इन बायोटेक्नॉलॉजी, बीएससी इन बायो केमिस्ट्री, बीएससी इन बायो मेडिकल सायन्स, बॅचलर इन फिजिओथेरिपी, बॅचलर इन फार्मसी, बॅचलर इन मेडिकल टेक्नोलॉजी, बीएससी इन ऑक्येपन्शनल थेरेपी, बीएससी इन ऑडियोलॉजी, स्पीच अँड लॅग्वेंज पॅथॉलॉजी, बीएससी इन रेडिओग्राफी, बीएससी इन रिहॅबिलिएशन थेरेपी, बीएससी इन फूड टेक्नॉलॉजी, बीएससी इन न्यूट्रिशियन अँड डायटिक्स आदी. 

सामान्य अभ्यासक्रम

बारावीनंतर अनेक पदवी अभ्यासक्रम सर्वांसाठी उपलब्ध आहेत. बीए इन जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन, बॅचलर इन हॉटेल मॅनेजमेंट, बॅचलर इन ट्रॅव्हल अँड टूरिझम, बॅचलर सन एलिमेंटरी एज्युकेशन, बॅचलर इन अ‍ॅडव्हरटायझिंग, बॅचलर इन फॉरेन लँग्वेज, बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स, बॅचलर ऑफ सोशल वर्क (बीएसडब्ल्यू), बॅचलर इन फिजिकल एज्युकेशन, बॅचलर इन पब्लिक रिलेशन, बॅचलर ऑफ फाईन आर्टस्, बॅचलर इन इव्हेंट मॅनेजमेंट, बॅचलर इन अ‍ॅपरेल डिझाईन, बॅचलर इन ग्राफिक डिझाईन, बॅचलर इन सायकोलॉजी, बॅचलर इन पब्लिक रिलेशन, बॅचलर इन जिओग्राफी, बॅचलर इन पॉलिटिकल सायन्स, बॅचलर इन हिस्ट्री आदी.

कौशल्य विकास अभ्यासक्रम 

रोजगाराच्या द‍ृष्टीने अभ्यासक्रम निवडायचे असतील तर बारावीनंतर विद्यार्थी कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रमाची निवड करू शकतो. या अभ्यासक्रमाच्या मदतीने करिअर करण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. बारावीनंतर चांगले कॉलेज आणि चांगल्या अभ्यासक्रमाची निवड ही महत्त्वाची असते. पदवीबरोबर कौशल्य विकास अभ्यासक्रम केल्याने करिअरला दिशा मिळू शकते. सध्याच्या काळात जे कौशल्य विकास अभ्यासक्रम आहेत, त्यात काही आर्टिफिशियल इंटिलिजिन्स, क्लाऊड कम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी, डिजिटल मार्केटिंग, फूड प्रोसेसिंग, ब्लॉगिंग, टूरिझम, फॉरेन लँग्वेज, फॅशन, कम्युनिकेशन, डेटा सायन्स, डिझाइनिंग तसेच अ‍ॅक्च्युरियल सायन्स आदींचा समावेश आहे. या अभ्यासक्रमाची निवड करून पदवीबरोबर रोजगाराला अधिक व्यापक रुप देऊ शकतो. 

इंजिनिअरिंग अभ्यासक्रम

विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण होणारे बहुतांश विद्यार्थी बीई करतात. बीई म्हणजेच बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. यात अनेक शाखा आहेत. त्याची निवड करून इंजिनिअर होता येते. हा अभ्यासक्रम चार वर्षांचा असतो. मात्र, बीसीए, बीएससी हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा असतो. याशिवाय विद्यार्थ्यार्ंसाठी टेक्निकल अभ्यासक्रमाचा देखील पर्याय आहे. बारावीनंतर जेईई मेन, अ‍ॅडव्हान्स देऊन देशातील आघाडीच्या आयआयटीमध्ये प्रवेश मिळवता येतो. त्याचवेळी इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रमही निवडता येतो. 

 मेडिकल क्षेत्र

वैद्यकीय क्षेत्रात एमबीबीएस हा आजचा लोकप्रिय अभ्यासक्रम मानला जातो. मात्र, सध्याच्या वाढत्या स्पर्धेच्या युगात नीट परीक्षा (नॅशनल इलजिबिलिटी कम एंटरन्स टेस्ट) क्लिअर होणे गरजेचे आहे. यात हुशार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. उर्वरित विद्यार्थी डेन्टल करतात. किंवा बीफार्म, बीयूएमएस करतात. सध्याच्या काळात फार्मसी, नर्सिंग अभ्यासक्रमांना मागणी वाढत चालली आहे. 

या व्यतिरिक्‍त डिप्लोमा इन एज्युकेशन (डीएड) पदवीला प्रवेश घेता येतो. या पदवीनंतर शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी मिळते. डीएड उत्तीर्ण झाल्यानंतर बीएड, एमएड अभ्यासक्रम करता येतो. 
सध्या शाळांची वाढती संख्या लक्षात घेता हे क्षेत्र व्यापक झाले असून या ठिकाणी दर्जेदार आणि उत्तम शिक्षकांना नेहमीच मागणी राहिली आहे.