Sat, Oct 31, 2020 13:24होमपेज › Edudisha › दिव्यांग पुनर्वसनाच्या क्षेत्रातील करिअर संधी

दिव्यांग पुनर्वसनाच्या क्षेत्रातील करिअर संधी

Last Updated: Oct 13 2020 2:28AM
अपर्णा देवकर

क्षेत्राची व्यापकता लक्षात येईल. शारीरिक आणि मानसिक विकलांग व्यक्तीला दिव्यांग किंवा दुर्बल असे म्हणतो. दिव्यांगता किंवा विकलांगता ही अनेक प्रकारची असू शकते. अंध, कमी द़ृष्टी, लप्रोसी क्योर्ड, कर्णबधिर, अपंग, लोकोमीटर दिव्यांगता, मनोरुग्ण, मतिमंद, सेरेब्रल पाल्सी, बहु दिव्यांगता, ऑटिझम (गतिमंद) या आजाराने पीडित व्यक्तींना सतत आधाराची गरज भासते. त्यांना स्वावलंबी करण्यासाठी आणि त्यांना शिक्षण देण्यासाठी अनेक प्रकारच्या तज्ज्ञांची गरज भासते. म्हणून त्यांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जातात. त्यामुळे तज्ज्ञ आणि मदतनिसाच्या आधारे अपंग, दिव्यांग व्यक्तीचे जीवन सुसह्य करणे शक्य आहे. या तज्ज्ञात विशेष शिक्षक, ऑडिओलॉजिस्ट, स्पीच पॅथोलॉजिस्ट, ऑक्यूपेशनल थेरोपिस्ट, ओर्थोजिस्ट, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, फिजिओथेरिपिस्ट, ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट, आथॅटिस्ट आणि प्रोस्थेटिस्ट अशक्त आणि दिव्यांग पुनर्वसन तज्ज्ञ आणि विशेषज्ञ यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. प्रत्येक दिव्यांग आणि विकलांग व्यक्तीची गरज वेगळी असते. परिस्थितीपासून त्यांचा बचाव करण्यासाठी व्यवस्थापन करताना वेगवेगळे धोरण अंगिकारावे लागते. जसे की, मूकबधिर व्यक्तीसाठी सांकेतिक भाषेचा वापर करावा लागतो, अंध व्यक्तीसाठी ब्रेल लिपीची मदत घ्यावी लागते. 

याप्रमाणे वेगवेगळ्या दिव्यांग व्यक्तींना प्रशिक्षित करण्यासाठी वेगवेगळ्या अभ्यासक्रमाची गरज भासते.  भारतीय पुनवर्सन परिषद (आरसीआय) ने देशात 600 हून अधिक संस्थांना डिसेबिलिटी रिहॅबिलिटेशन सायन्स) म्हणजेच विकलांग आणि दिव्यांग पुनवर्सन शास्त्रशी संबंधी अभ्यासक्रम शिकवण्याची परवानगी दिली आहे. या संस्था विकलांग आणि दिव्यांग पुनवर्सन क्षेत्रात प्रमाणपत्र, डिप्लोमा, पी. जी. डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर पदवी आणि एम.फील यांसारखे अभ्यासक्रम चालवतात. देशभरात अभ्यासक्रमाशी संबंधी सुमारे 60 प्रकारचे मान्यताप्राप्त अभ्यासक्रम आहेत. अनेक संस्थांकडून गतिमंद, सेरेबल्स पाल्सी, डीफ, ब्लाइंडनेस, कर्णबधिर, मूकबधिर, लर्निंग दिव्यांगता, मनोरुग्ण, बहू दिव्यांगता आणि द़ृष्टिदोष यासाठी विशेष अभ्यासक्रमाचे संचलन केले जाते.

 "