Wed, Jan 20, 2021 09:28होमपेज › Belgaon › बेळगाव : बोअरवेल मोटारींची चोरी करणारा चोरटा ताब्यात 

बेळगाव : बोअरवेल मोटारींची चोरी करणारा चोरटा ताब्यात 

Last Updated: May 22 2020 10:02AM

बोअरवेल मोटारींची चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात घेतले.बेळगाव : पुढारी वृत्तसेवा 

बेळगाव जिल्ह्यातील झाड शहापूर परिसरातील शेतीवाडी मधील बोअरवेल मोटारी, वायर्सची चोरी करणाऱ्या चोरट्याला शेतकऱ्याने पकडले आहे. ही घटना काल दुपारी दोन वाजता घडली. चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

वाचा :महाराष्ट्र कनेक्शन कर्नाटकची डोकेदुखी 

गेल्या दोन वर्षापासून वाघवडे, मच्छे, देसूर  परिसरात शेतवाडी मधील विद्युत मोटार आणि उपकरणे बोअरवेलच्या वायर्स  लंपास करण्याच्या प्रकारात वाढ झाली होती. याबद्दल अनेकवेळा ग्रामीण पोलिस स्टेशनला तक्रार करून देखील कोणत्याही चोरट्याला पकडण्यास ग्रामीण पोलिसांना यश आले नव्हते. दोन वर्षापासून सतत चोरी करण्याच्या प्रकारात वाढ झाल्याने अक्षरशा शेतकरीवर्ग हैराण झाले होते.

बोअरवेल मधील वायरस, मोटर्सच्या चोऱ्या झाल्यामुळे पाण्याविना शेतातील पिके वाळून जात होती. कित्येकवेळा याबद्दल पोलिसात तक्रार करून देखील काही उपयोग झाला नव्हता. झाड, शहापूर, वाघवडे परिसरातील शंभरहून अधिक शेतकऱ्यांच्या शेतीवाडी मधील विद्युत उपकरणाची चोरीझाल्यापासून नेमक्या या चोऱ्या कोण करत आहे याबद्दल शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले होते.

काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये लक्ष ठेवून गुरुवार (दि.२१) रोजी दुपारी दोन वाजता भरमा मारुती पिरणवाडी यांच्या बोअरवेल मधील वायर कट करत असताना हुनचेनटी येथील एका युवकाला शेतकऱ्यांनी रंगेहात पकडून ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. संबंधित चोरट्याचे साथीदार पळून जाण्यास यशस्वी झाले. याचा पोलिस पुढील तपास करत आहेत.

वाचा : क्‍वारंटाईन असूनही  प्रवास! तापाची लक्षणे दिसल्यामुळे तारांबळ