Mon, Jan 18, 2021 09:10होमपेज › Belgaon › चोरट्यांचा मोर्चा आता शिवाराकडे

चोरट्यांचा मोर्चा आता शिवाराकडे

Last Updated: Oct 21 2019 9:49PM
बेळगाव : प्रतिनिधी

शिवारात सातत्याने चोरीचे प्रकार सुरु आहेत. आतापर्यंत चोरांकडून केवळ दागदागिन्यांवर डल्‍ला मारला जात होता. आता शिवारातील शेतमालावर डल्‍ला मारण्यात येत असल्याने जात असल्याने शेतकर्‍यामध्ये चिंतेचे वातावरण पसरले  आहे.

सहा दिवसापूर्वी बेकिनकेरे येथील पाच शेतकर्‍यांच्यह 55 पोती बटाट्यांची चोरी झाली. दोन महिन्यापूर्वी याच गावात मण्णूर मार्गाला लागून असणार्‍या शेतातील बोअरवेलची मोटर चाोरुन नेली. यापूर्वीही अनेकवेळा असे प्रकार घडले आहेत. परंतु याबाबत पोलिसात तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. पोलिसांचा नाहक त्रास नको म्हणून तक्रार दाखल करण्याचे टाळण्यात येत आहे.

येथील भीमसेन कोळी यांच्या चोरीला गेलेल्या मोटारीचा तपास अद्याप लागला नाही. तोवर लक्ष्मण बसरीकट्टी, नागोजी यळळूरकर, मल्‍लाप्पा बिर्जे, लक्ष्मण सनदी यांच्या 55 पोती बटाट्यांची चोरी झाली आहे. यामागे एखाद्या सराईत चोरांच्या टोळीचा हात असावा, असा अंदाज ग्रामस्थांना आहे. 

दोन महिन्यांपूर्वी अगसगे येथे म्हैशींची चोरी झाली आहे. तर बेकिनकेरे, होसूर, कोवाड या मार्गावर बकर्‍यांची चोरी झाली आहे. अगसगे येथील चोरीचा छडा लागला आहे. उर्वरित चोरींचा अद्याप छडा लागलेला नाही. यामुळे शेतकरी हवालदिल बनला आहे.

सुळगा, हिंडलगा, कावळेवाडी, हंगरगा येथे शेतकरी शेताकडे गेल्याची खात्री करुन चोरट्यांनी बंद घरे फोडली आहेत. या प्रकारामुळे शेतकर्‍यांत घबराट निर्माण झाली आहे. चोरट्यांकडून शस्त्रांचा वापर होत असल्याने जीवास धोका आहे. त्यामुळे घरी वृध्द नागरिकांना घरी ठेवून शेताकडे जाणेही धोक्याचे बनले आहे. या सर्व प्रकारात एकाच टोळीचा सहभग असण्याची शक्यता आहे.

तालुक्यात वाढत्या चोरीच्या घटनामुळे शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे चोरीच्या घटनांना आळा  घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने  गस्त वाढवण्याची आवश्यकता आहे. 

एपीएमसी सीसीटीव्ही तपासावी

बेकिनकेरे येथून बटाटे चोरल्यानंतर सदर बटाट्यापैकी 20 पोती बटाटे बेळगाव एपीएमसीमध्ये विकल्याचा संशय आहे. त्यामुळे काकती पोलिसांनी त्यादृष्ठीने सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा छडा लावावा अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे. चोरांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.