Fri, Feb 28, 2020 23:30होमपेज › Belgaon › शाहूनगरात साकारले ऐतिहासिक कोल्हापूर

शाहूनगरात साकारले ऐतिहासिक कोल्हापूर

Last Updated: Nov 22 2019 8:25PM
बेळगाव : प्रतिनिधी 

शहर परिसरात विविध ठिकाणी शाळकरी मुलांसह ऐतिहासिक किल्‍ले  उभारणी सुरु आहे. मात्र, शाहूनगरातील विनायक कॉलनीतील श्री युवक मंडळाने ऐतिहासिक कोल्हापूरच साकारले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गड, किल्‍ले तसेच नद्यांच्या प्रतिकृतीही साकारल्या आहेत. 

विनायक कॉलनी एक गुंठा परिसरात प्रशस्त ठिकाणी सदर किल्ला साकारला आहे. कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर, रंकाळा तलाव, पंचगंगा नदी, वाडी-रत्नागिरी येथील जोतिबा मंदिर, पावनगड, पन्हाळगड, मसाई पठार, पावनखिंड, विशालगड यासह कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य नद्यांच्या प्रतिकृतीही साकारण्यात आल्या आहेत. प्रशस्त आवारात विविध गडकिल्ले आकर्षक पद्धतीने उभारल्याने परिसरातील नागरिकांकडून पाहण्यासाठी गर्दी होत आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीने राक्षसाचा वध कशाप्रकारे केला आहे. याचे चित्रही दाखविण्यात आले आहे. या मंडळाच्या सदस्यांनी स्वखर्चातून सुमारे 25 हजार रुपयांचा खर्च केला आहे.

मंडळाचे अध्यक्ष व्यंकटेश दोडमनी यांच्यासह श्रेयस नाकाडी, विवेक हुद्दार, भरत कोटनीस, मंथन हुद्दार, अभिषेक धामणेकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.