Sat, Feb 29, 2020 19:16होमपेज › Belgaon › उचवडेजवळ अज्ञाताकडून विवाहितेवर बलात्कार

उचवडेजवळ अज्ञाताकडून विवाहितेवर बलात्कार

Published On: Apr 05 2019 1:47AM | Last Updated: Apr 04 2019 11:44PM
खानापूर : प्रतिनिधी

बेळगाव-पिरनवाडी-जांबोटी मार्गावरील उचवडेनजीक खडीमशीन क्वॉरीवर कामाला असलेल्या विवाहित महिलेवर अज्ञाताने बलात्कार केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. याबाबत पीडित महिलेने खानापूर पोलिसांत अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिस निरीक्षक मोतीलाल पवार तपास करत आहेत.

उचवडेानजीक असलेल्या क्वॉरीवर गोकाक तालुक्यातील दांपत्य वॉचमन म्हणून कामाला आहे. बुधवारी सकाळी पती बेळगावला दवाखान्याला गेला असताना दुचाकीवरुन आलेल्या एका अनोळखीने घरात एकट्या असलेल्या महिलेकडे पिण्यासाठी पाण्याची मागणी केली. जवळ कोणी नसल्याने त्याने सदर महिलेवर अत्याचार केला. सायंकाळी पती घरी आल्यानंतर पीडितेने घडलेल्या प्रकाराची माहिती त्याला दिली. 

सायंकाळी खानापूर पोलिस स्थानक गाठून अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्प्लेंडर दुचाकीवरुन आलेल्या नराधमाने हे कृत्य केले असून त्याचा शोध जारी आहे. गुरुवारीही खानापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास हाती घेतला आहे.