Thu, Feb 20, 2020 15:59होमपेज › Belgaon › महिपाळगड परिसराचे पावित्र्य धोक्यात

महिपाळगड परिसराचे पावित्र्य धोक्यात

Published On: Apr 12 2018 1:21AM | Last Updated: Apr 11 2018 10:47PMबेळगाव : प्रतिनिधी 

कर्नाटक सीमेवर वसलेल्या आणि बेळगावहून सुमारे 15 कि.मी. वर असलेला महिपाळगड परिसर तसेच प्राचीन हेमाडपंथी वैद्यनाथ देवस्थान परिसराचे पावित्र्य धोक्यात आले आहे. या ठिकाणी पर्यटनाच्या नावाखाली अश्‍लील प्रकार व हुल्लडबाजी होत आहे. महाविद्यालयीन प्रेमी युगुलांची वर्दळ वाढली असून यांच्याकडून सार्वजनिक परिसराचा गैरवापर होत आहे. यामुळे इतिहासप्रेमींतून तीव्र खेद व्यक्‍त होत आहे.

छत्रपती शिवरायांचा किल्ला म्हणून या गडाची वेगळी ओळख आहे. इतिहासकाळापासून या गडाचे लष्करीदृष्ट्या असणारे महत्त्व आजतागायत कायम आहे. या ठिकाणी मराठा लाईट इन्फंट्रीतर्फे नव्या जवानांसाठी प्रशिक्षण दिले जाते. हा परिसर प्रशस्त असून घनदाट झाडेझुडपे आहेत. काही वर्षापूर्वी या घनदाट झाडीत खुनाचे प्रकारही घडले आहेत. वाईट कृत्ये लपविण्यासाठी या परिसराचा सातत्याने पयोग केला जातो. गडावर दीपमाळ आहे. प्राचीन विहिरीसह परिसर निसर्गरम्य आहे. या मंदिराशेजारीच प्राचीन वैद्यनाथ मंदिर आहे. चंदगड तालुक्यासह बेळगाव परिसरातील एक श्रद्धास्थान म्हणून मंदिराला मोठे स्थान आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन, गडकोट विकासाचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसडर आणि रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष खा. छत्रपती संभाजी राजे यांच्या पुढाकाराने विकास आराखड्याचे काम सुरू आहे.

गडाच्या उत्तरेला पावसाळ्यात मोठा धबधबा प्रवाहित होतो. अलिकडे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूत पर्यटकांची गर्दी असते. शाळा, कॉलेजच्या सहलीही काढल्या जातात. मात्र, तोंडावर स्कार्फ बांधून दुचाकीवर येणार्‍या प्रेमीयुगुलांचा वावर वाढला आहे. कॉलेजच्या नावावर बाहेर पडायचे आणि गडावर भटकायचे, असे प्रकार होत आहेत. यामुळे कुटुंबवत्सल व शालेय विद्यार्थ्यांवर परिणाम होत आहे. चंदगड पोलिसांकडून अधून-मधून कारवाई होते. मात्र यात सातत्य हवे. गडावर पर्यटनाच्या नावाखाली मद्य घेऊन जाणार्‍या वाहनांवर कारवाई झाली तर अवैध प्रकारांना आळा बसेल,असे स्थानिक म्हणतात

Tags :.primises, mahipagadin, danger,belgaon news