Wed, Apr 01, 2020 00:24होमपेज › Belgaon › उंच श्रीमूर्ती आणताय, संपर्क साधा

उंच श्रीमूर्ती आणताय, संपर्क साधा

Published On: Sep 02 2019 1:29AM | Last Updated: Sep 01 2019 10:49PM
बेळगाव : प्रतिनिधी

तीन दिवसांपासून शहरात सार्वजिनक श्रीमूर्ती आगमन सोहळ्याला सुरूवात झाली आहे. दरम्यान, रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास भाग्यनगरमध्ये श्रीमूर्तीचा वीजवाहिनीला स्पर्श झाल्याने मूर्तीवरील प्लास्टिक पिशवीने पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झाली नसली तरी खबरदारी म्हणून उंच मूर्ती आणताना मंडळाने हेस्कॉमला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हेस्कॉमला याबाबत कळविल्यास संबंधित मार्गावरील वीजपुरवठा खंडीत करण्यात येईल, अशी माहिती हेस्कॉमचे साहाय्यक कार्यकारी अभियंंते अरविंद गदगकर यांनी दिली.

शहर व उपनगरात उंच मूर्तीची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पाच ते आठ फूटापर्यंत श्रीमूर्ती सहज नेता येते. मात्र, 10 ते 15 फूट मूर्ती घेऊन जाताना अडचणी येतात. मंडळांचे कार्यकर्ते बांबूच्या साहाय्याने वीजवाहिन्या उचलून मूर्ती नेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र, यामुळे दुर्घटना होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे मूर्ती उंच असेल तर हेस्कॉमला माहिती द्यावी. त्याप्रमाणे त्या मार्गावरील वीजपुरवठा खंडित केला जाईल. त्यासाठी मंडळाने आपल्या भागातील संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा, असे हेस्कॉमकडून सांगण्यात आले आहे.