Wed, Sep 23, 2020 20:53होमपेज › Belgaon › कांदा मार्केट आज बंद

कांदा मार्केट आज बंद

Last Updated: Nov 08 2019 8:35PM
बेळगाव : प्रतिनिधी

कृषी उत्पन्न बाजार समितीध्ये बुधवारी कांद्याची आवक विक्रमी झाली आहे. त्यामुळे शनिवारी (दि.9) लिलाव बंद राहणार आहे. मार्केटमध्ये कांदा उतरण्यास जागा नााही. त्यामुळे कांदा व्यापारी असोसिएशनने निर्णय घेतला आहे. 

बाजारात बुधवारी 65 हजार क्विंटल कांदा दाखल झाला असून कांदा शिल्लक आहे.   गदग, धारवाड, बागलकोट, हावेरी, विजापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी कांदा  बाजारात घेऊन येऊ नये, असे कळवण्यात आले आहे. आठवडी बाजारात 3900 ते 5450 रूपये क्विंटल कांदा झाला होता. हुबळी येथील बाजार बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे बेळगाव एपीएमसीत विक्रमी कांदा दाखल झाला आहे. 

पावसात भिजल्याने कांदा लवकर खराब होतो. परतीच्या पावसाने कांदा खराब झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसह व्यापार्‍यांनाही मोठा फटका बसला आहे.  एपीएमसीत रिकामी असलेल्या गोदामातून कांदा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारी बाजार बंद ठेवण्यात आला असून शेतकर्‍यांनी कांदा आणू नये, असे आवाहन कांदा व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष राजाराम पाटील यांनी  कळवले आहे. 
 

 "