होमपेज › Belgaon › निपाणीत कडकडीत बंद

निपाणीत कडकडीत बंद

Published On: Jan 06 2018 1:18AM | Last Updated: Jan 06 2018 12:52AM

बुकमार्क करा
निपाणी : प्रतिनिधी

कोेरेगाव भीमा प्रकरणाच्या निषेधार्थ येथील बहुजन समाजाने शुक्रवारी पुकारलेल्या निपाणी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, रिक्षा व वडाप संघटनेने सहभाग घेतल्याने आणि निपाणी आगाराने बससेवा बंद ठेवल्याने बंद 100 टक्के यशस्वी झाला. 

सकाळी 10.45 वा. जत्राट वेस मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दलित संघटनांनी भव्य मोर्चा काढला.  मोर्चात आजी-माजी आमदार, आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

महात्मा बसवेश्‍वर पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यावर चिक्‍कोडी रोडमार्गे हा मोर्चा बस स्थानकासमोरील धर्मवीर संभाजीराजे चौकात आला. तेथे दलित बांधवांनी मानवी साखळी करून ठिय्या धरला तसेच घोषणांनी परिसर दणाणून सोडला. त्यानंतर मोर्चा जुना पी. बी. रोड मार्गे नगरपालिकेजवळ आल्यावर डॉ. आंबेडकरांंच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तेथून मोर्चा विशेष तहसील कार्यालयावर नेण्यात आला. 

मोर्चाच्या वतीने 5 लहान मुलांच्या हस्ते उपतहसीलदार एन. बी. गेज्जी यांना निवेदन देऊन भीमा कोरेगाव भीमा दंगलीतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. 

डीएसपी बी. एस. अंगडी व सीपीआय किशोर भरणी यांनी बंदोबस्त ठेवला होता.