Tue, Sep 22, 2020 06:27होमपेज › Belgaon › बेळगाव : शहीद प्रकाश जाधव यांना 'किर्तीचक्र' 

बेळगाव : शहीद प्रकाश जाधव यांना 'किर्तीचक्र' 

Published On: Aug 14 2019 12:47PM | Last Updated: Aug 14 2019 1:22PM

शहीद प्रकाश जाधवबेळगाव : पुढारी ऑनलाईन

निपाणी तालुक्यातील बुदिहाळमधील शहीद प्रकाश जाधव यांना किर्तीचक्र जाहीर झाले आहे. आज (ता.१४) वीर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. शहीद प्रकाश जाधव यांच्या पश्चात आई, वडील, पत्‍नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. जाधव यांचे वडील सेवानिवृत्त सैनिक आहेत. 

प्रकाश जाधव २७ नोव्हेंबर २०१८ रोजी काश्मीरमधील कुलगाम येथे झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झाले होते. भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी विमानाला पिटाळून लावणारे हिरो विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना 'वीरचक्र'ने सन्मानित करण्यात येणार आहे. बालाकोट हवाई हल्ल्यानंतर भारतीय हद्दीत शिरलेले पाकिस्तानचे एफ-16 विमान अभिनंदन यांनी पाडले होते.  

हवाई दलाच्याच स्क्वॉडन लीडर मिनटी अग्रवाल युद्ध सेवा मेडल जाहीर झाले. बालाकोट एअर स्ट्राईकनंतर २७ फेब्रुवारीला पाकिस्तानशी झालेल्या हवाई संघर्षामध्ये फायटर कंट्रोलरची भूमिका त्यांनी पार पाडली होती. वीर पुरस्कारांमध्ये आठ जवानांना शौर्यचक्र जाहीर झाले. यामध्ये पाच जणांना मरणोत्तर सन्मानित करण्यात आले. 

देशासाठी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल सैन्य दलांतील जवानांना दिले जाणारे परमवीर चक्र, महावीर चक्र या दोन सर्वोच्च शौर्य पुरस्कारानंतर वीरचक्र हा पुरस्कार दिला जातो. वीर पुरस्कार सहा प्रकारांमध्ये दिले जातात. त्यामध्ये अनुक्रमे परमवीर चक्र, अशोक चक्र, महावीर चक्र, किर्तीचक्र, वीर चक्र आणि शौर्य चक्रचा समावेश आहे. परमवीर, महावीर आणि वीर चक्र युद्ध काळातील सर्वोच्च त्याग आणि बलिदानासाठी दिले जाते. दरम्यान, अशोक, किर्ती आणि शौर्य चक्र शांतता काळात सर्वोच्च सेवा आणि बलिदानासाठी जाहीर केले जाते 

वर्षातून दोनवेळा या पुरस्कारांची घोषणा केली जाते. राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्कारांचे प्रदान होते. यासाठी राष्ट्रपती भवनात खास कार्यक्रम जाहीर केला जातो. यावेळी पुरस्कार विजेत्याला किंवा त्यांच्या कुटुंबियांना हे पुरस्कार दिले जातात. दरम्यान, परमवीर चक्र आणि अशोक चक्रमध्ये असे होत नाही. राष्ट्रपती हे दोन्ही पुरस्कार प्रजासत्ताक दिनी प्रदान केले जातात.