Wed, Apr 01, 2020 00:17होमपेज › Belgaon › ‘त्यां’च्याकडून एकी करण्याबद्दल दिशाभूल

‘त्यां’च्याकडून एकी करण्याबद्दल दिशाभूल

Published On: Apr 27 2018 12:52AM | Last Updated: Apr 27 2018 12:06AMबेळगाव ः प्रतिनिधी

बेळगावातील एका मराठी दैनिकाने (दै. पुढारी नव्हे) लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालविला आहे.  कारण किरण गटाने पाठविलेले पत्र आपल्याला बैठकीची तारीख ठरल्यानंतर मिळाले.  शहर म. ए. समितीची जी भूमिका आहे, तीच  आमची आहे. कै. हुंदरे स्मृतिमंच व पाईकांकडून  होत असलेल्या कार्याबाबत दिशाभूल करण्याचे कार्य  त्या दैनिकांनडून सुरु आहे. त्यावर जनतेने विश्वास ठेवू नये, असे आवाहन सुरेश हुंदरे स्मृतिमंचने केले आहे.

बेळगावमध्ये दक्षिण व उत्तरमधून म. ए. समितीचा एकच उमेदवार देण्याबाबत गुरुवार दि. 26 रोजी सायं. 6 वाजता  मंचतर्फे अनगोळमधील आदर्श सोसायटीच्या सभागृहात बैठक बोलावण्यात आली होती. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. राम आपटे होते.

कै. हुंदरे स्मृती मंच व पाईकांकडून बेळगावमध्ये सर्व मतदार संघातून म. ए. समितीचा एकच उमेदवार निवडणूक रिंगणात उभा करण्यासाठी प्रयत्न आहे. दोन्ही गटातील उमेदवारांना एकत्र बोलावून मंगळवारी बोलावून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न झाला. मात्र, यश आले नाही. पुन्हा गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता बैठक पार पडली. 

शुक्रवार, दि. 27 रोजी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत असून शुक्रवारी दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. त्यासाठी पुन्हा हुंदरे स्मृती मंच व पाईकांकडून शुक्रवार दि. 27 रोजी संध्याकाळी 6 वाजता आदर्श सोसायटीच्या सभागृहात बोलाविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

बैठकीला प्रदीप मुरकुटे, ईश्वर लगाडे, राजेंद्र मुतगेकर, प्रभूूल कपालवाडे, महादेव चौगुले, संजय मोरे, डॉ. विजय हलगेकर, सुभेदार केदारी मोटार, एस. के. पाटील, गोविंद राऊत, आर. डी. भांदूर्गे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

Tags : maharashtra ekikaran samiti, karnataka assembly election 2018, belgaon,