Sat, Sep 19, 2020 17:27होमपेज › Belgaon › निपाणी : कुरली आप्पाचीवाडी येथे बिबट्याचे दर्शन

निपाणी : कुरली आप्पाचीवाडी येथे बिबट्याचे दर्शन

Last Updated: May 22 2020 1:49PM
नागरिकांमध्ये भीती 

निपाणी : पुढारी वृत्तसेवा

कुरली आप्पाचीवाडी शिवारात कुरली आप्पाचीवाडी मार्गाला लागून असलेल्या माळी बंधूंच्या शेतात काही शेतकऱ्यांना बिबट्या दिसला. त्यामुळे नागरिक व शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे. 

शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने प्रथमदर्शनी आप्पाचीवाडी शिवारात दर्शन दिल्यानंतर कुरली परिसराच्या दिशेने धूम ठोकली. बिबट्या आल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तातडीने कुरली ग्रामपंचायत अध्यक्ष अमर शिंत्रे यांनी निपाणी तालुका वनखात्याला याची माहिती देऊन पाचारण केले आहे. शिवारात काम करणाऱ्या रामदास कमते यांना पूर्णपणे बिबट्या दिसला. घटनास्थळी वनाधिकारी प्रभाकर गोकाक यांनी भेट देऊन मिळालेल्या ठसे व माहितीच्या आधारे ग्रामपंचायत प्रशासन व नागरिकांच्यावतीने शेत शिवारात लपून बसलेल्या बिबट्याला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

 "