Tue, Sep 22, 2020 09:00होमपेज › Belgaon › कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा होम क्‍वारंटाईन

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा होम क्‍वारंटाईन

Last Updated: Jul 11 2020 1:02PM

मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पाबेळगाव : पुढारी ऑनलाईन

मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे गृह कार्यालय कृष्णा येथील काही कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याने मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी स्वतःला होम क्‍वारंटाईन केले आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. काही कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली असून घरातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे काही सूचना देण्यात येतील, असे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील टेलिफोन ऑपरेटर, दोन एस्कॉर्ट, स्वयंपाकी, कारचालकासह दहाजणांना कोरोनाची लागण झाली आहे.

अधिक वाचा :  राज्यात उच्चांकी 57 बळी

मुख्यमंत्री येडियुराप्पा पुढे म्हणाले 'मी ठीक आहे कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्व होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करा आणि मास्कचा वापर करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 "