Fri, Feb 28, 2020 23:26होमपेज › Belgaon › कारवारात अडीच किलो सोने जप्त

कारवारात अडीच किलो सोने जप्त

Published On: Apr 02 2019 1:56AM | Last Updated: Apr 01 2019 11:46PM
कारवार : प्रतिनिधी

यल्लापूरमार्गे हुबळीकडे निघालेल्या पाच नेपाळी युवकांना पोलिसांनी सोमवारी अटक करून त्यांच्याकडे सुमारे अडीच किलो सोने, साडेतीन किलो चांदी असा सुमारे 70 लाखांचा ऐवज जप्त केला. 

सीताराम भीम बहाद्दूर (31), एकनाथ मान बहाद्दूर (18), दम्मार बहाद्दूर (20), बालसिंग बहाद्दूर (20) व एक अल्पवयीन अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे पाचजण कारने कारवारहून हुबळीला निघाले होते. लोकसभा निवडणुकीमुळे उभारण्यात आलेल्या चेकपोस्टवर पोलिसांनी कार अडवून तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडे 2.44 किलो सोने, 3.50 किलो चांदी आणि रोकड सापडली. याबाबत विचारल्यानंतर त्यांच्याकडून स्पष्ट उत्तरे मिळाली नाही. त्यामुळे त्यांना अटक करून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. मात्र, आवश्यक कागदपत्रे दाखवण्यात ते अपयशी ठरले. निवडणूक अधिकार्‍यांचे पथक आणि पोलिसांकडून संयुक्तपणे चौकशी करण्यात येत आहे.