Thu, Jul 09, 2020 23:09होमपेज › Belgaon › देवेगौडा अन् तात्या रिश्ता वही, पार्टी नई?

देवेगौडा अन् तात्या रिश्ता वही, पार्टी नई?

Published On: Aug 04 2019 1:50AM | Last Updated: Aug 04 2019 12:44AM
कागवाडचे निलंबित आमदार श्रीमंत पाटील आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांची मैत्री प्रसिध्द आहे. तात्यांनी बंडखोरी केल्याने या मैत्रीला काहीसे तडे गेले आहेत. 

अथणी शुगर कारखान्याच्या स्थापनेपासून एच. डी. देवगौडा आणि तात्या यांच्यात मैत्री आहे. देवेगौडा जसे काही तात्यांचे कौटुंबिक सदस्यच आहेत. तात्यांची मुले सुशांत आणि योगेश यांच्या लग्‍नाला देवेगौडा आवर्जून हजर होते.  कारखान्यात अनेक कार्यक्रम झाले, शेतकरी मेळावा झाला यालाही ते हजर होते. उत्तर कर्नाटकात कोणताही  दौरा असो देवेगौडा यांची कारखान्याला भेट ठरलेली असायची. देवेेेगौडा यांच्या अग्रहाखात तात्यांनी एकदा विधानसभा आणि एकदा लोकसभेची निवडणूक लढवली. कमी मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला. तात्यांनी जेव्हा बंडखोरी केली तेव्हा देवेगौडा दु:ख झाले. अक्षरश: त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. आता ही पुन्हा दोस्ती जुळणार का,  अशी चर्चा सुरु झाली आहे.