Wed, Sep 23, 2020 22:06होमपेज › Belgaon › माजी आ. नारायण तरळे यांचे निधन

माजी आ. नारायण तरळे यांचे निधन

Last Updated: Nov 25 2019 1:30AM
बेळगाव : प्रतिनिधी

जाधवनगर येथील रहिवासी व बेळगावचे माजी आमदार नारायण गोविंदराव तरळे (वय 83) यांचे शनिवारी मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते म. ए. समितीचे अध्यक्ष व मराठा मंडळचे विश्‍वस्त होते. 

सीमा प्रश्‍नासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. विविध लढ्यांत त्यांचा सहभाग होता. सीमा प्रश्‍नासाठी झालेल्या आंदोलनांतून अनेकवेळा त्यांनी कारावास भोगला आहे. रविवारी दुपारी अंत्यसंस्कार झाले. यावेळी जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

 "