Fri, Feb 28, 2020 23:19होमपेज › Belgaon › उचगावच्या एजंटवर फसवणुकीचा गुन्हा

उचगावच्या एजंटवर फसवणुकीचा गुन्हा

Published On: Mar 03 2018 1:52AM | Last Updated: Mar 02 2018 11:32PMबेळगाव : प्रतिनिधी

मलेशियाचा बनावट कर्मचारी व्हिसा बनवून दिल्याच्या संशयाखाली सलमान अब्दुलमुनीव सनदी (वय 27, रा. उचगाव, ता. बेळगाव) व खलीद गुलाब पटेल (रा. गडहिंग्लज) यांच्यावर गडहिंग्लज पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्यानुसार दोघांना अटकही झाली. मात्र, सलमानने अटकपूर्व जामिनाची कागदपत्रे हजर केल्यानंतर त्याला मुक्‍त करण्यात आले.

महमदरफिक दादाहयात भाई (रा. कडगाव, ता. गडहिंग्लज), अहमद अस्लम इराणी, नागाप्पा मारुती हुलसार, सलीम शेख, सचिन महादेव गुंठे (सर्व रा. गडहिंग्लज), समद अब्दुलगणी अत्तार (रा. नूल, गडहिंग्लज) यांना विदेशात नोकरी लावतो म्हणून या दोघांनी प्रत्येकी 90 हजार रुपये घेतले होते; मात्र मलेशियात गेल्यानंतर व्हिसाची मुदत केवळ एक महिन्याची असल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. त्याबाबतची फिर्याद गडहिंग्लज पोलिसात दिली होती. त्यानुसार दोघांना अटक झाली. मात्र सलमानने अटकपूर्व जामीन घेतलेला असल्याने चौकशी करून त्याला मुक्त करण्यात आले. गडहिंग्लज पोलिस पुढील तपास करत आहेत.