Thu, Sep 24, 2020 06:53होमपेज › Belgaon › बसच्या धडकेत दाम्पत्य ठार

बसच्या धडकेत दाम्पत्य ठार

Last Updated: Oct 08 2019 1:29AM
बेळगाव : प्रतिनिधी 

भरधाव वेगाने  जाणार्‍या परिवहन  मंडळाच्या बसने दुचाकीला मागून ठोकरल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या मुलासह एक नातेवाईक जखमी झाला. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वंटमुरी घाटात सोमवारी दुपारी 2.30च्या दरम्यान  हा अपघात घडला. 

भरमा यल्लाप्पा गस्ती (वय 28) आणि त्यांची पत्नी सावित्री (वय 26, दोघे रा. जुनी गुडगनट्टी, ता. हुक्केरी) अशी मृतांची नावे आहेत. त्यांचा मुलगा बजरंगी भरमा गस्ती (वय 3) व नातेवाईक संजू गस्ती (वय 42) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या 

माहितीनुसार ते चौघेजण एकाच दुचाकीवरून वंटमुरी गावाकडून जुनी गुडगनट्टीकडे जात होते. वंटमुरी घाट उतरून जात असताना घाट संपल्यानंतर राम ढाब्याजवळून ते महामार्ग ओलांडण्यासाठी उजवीकडे वळत होते. अचानक डाव्या बाजूला असणारी दुचाकी उजव्या बाजूला वळविण्यात आली. इतक्यात मागून येणार्‍या परिवहन मंडळाच्या हनगल ? विशाळगड बसने दुुुुचाकीला मागून धडक दिली. 

दुचाकीचालक भरमा व त्याची पत्नी सावित्री यांचा जागीच मृत्यूू झाला. महामार्गावरील  पुंजलाईड चे भरारी पथक अधिकारी सचिन हुक्केरी यांनी घटनेची माहिती काकती पोलिसांनी दिली. काकती पोलिस निरीक्षक श्रीशैल कौजलगी व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. 

वाहनांच्या रांगा

अपघात  घडताच महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काकती पोलिसांनी पंचनामा करून वाहतुकीला मार्ग मोकळा करून दिला. ऐन दसरा सणाच्या काळात घडलेल्या या घटनेमुळेे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.