Sun, Aug 09, 2020 11:51होमपेज › Belgaon › विजापुरात कडकडीत बंद

विजापुरात कडकडीत बंद

Published On: Dec 24 2017 1:43AM | Last Updated: Dec 23 2017 9:48PM

बुकमार्क करा

विजापूर : वार्ताहर

मल्लिकार्जुननगरातील 14 वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचार व खून प्रकरणी विविध दलित संघटना, महिला संघटनांच्यावतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. एका बसवर किरकोळ दगडफेक वगळता बंद शांततेत पार पडला.

सकाळपासूनच शहरातील प्रमुख बाजार पेठ, कापड मार्केट, सराफ बाजार, किरणा बाजार, भाजी मार्केट, सिनेमागृह, हॉटेल, किरकोळ विक्रेतांनी आपले व्यवहार बंद ठेवून बंदमध्ये सहभागी झाले होते. बसस्थानाकावरुन एकही बस सोडण्यात आली नाही तर एकही बस आली नाही, शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय, शहर बस वाहतुक सेवाही बंद होता.
 शहरातील प्रमुख भागासह अनेक गल्लीबोळात रस्त्यावर टायर पेटवून रस्तारोको करण्यात आला. दुचाकी वगळता, एकही चार चाकी वाहन, रिक्षा शहरात फिरताना दिसत नव्हती.सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला.

आंबेडकर चौकात उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर पिडीत मुलीच्या कुंटुंबियासह, राज्यातून, जिल्हातून आलेले विविध दलित संघटनेचे पदाधिकारी, महिला संघटनेचे  व अनेक संघ-संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सर्वांनीच आपल्या भाषणात जिल्हा प्रशासन, पोलिस खात्यावर जोरदार टीका करत त्या दुर्दैवी घटनेची तीव्र शब्दात निषेध करून संताप व्यक्त केला.  
सभास्थानी आलेले जिल्हाधिकारी के. बी.  शिवकुमार यांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणी तपासात निष्काळजीपणा केलेले जिल्हा पोलिस प्रमुख, तपास पोलिस अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, पिडित कुंटुंबियांना व साक्षीदारांना संरक्षण देण्यात यावे, कर्तवदक्ष, निष्ठवान पोलिस अधिकारीची नियुक्ती करुन पारदर्शकरित्या पुढील तपास करून, आरोपीवर गुन्हा व आरोपपत्र दाखल करावे, राज्यातील नामवंत वकिलास सरकारच्यावतीने नियुक्‍ती करण्यात येऊन विशेष जलद न्यायालयाची रचना लवकरात लवकार निकाल देण्याबरोबरच आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी.  पिडीत कुंटुंबीयांना 50 लाखांची आर्थिक मदत देऊन घरातील एकास सरकारी नोकरी द्यावी, अथवा 10 एकर शेत जमीन देण्यात यावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

चारजणांना अटक

याप्रकरणी चारजणांना अटक करण्यात आले असल्याची माहिती सीआयडी एसपी आनंद कुमार यांनी दिली. या घटनेतील प्रमुख आरोपी दीपक मुळसावळगीसह सागर मोरे, श्रीशैल मुचंडी व कैलास राठोड यांना अटक करण्यात आली असून इतर तीन आरोपींना शोधकार्य सुरू असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.