Sat, Feb 29, 2020 11:07होमपेज › Belgaon › बेळगावात पत्नीकडून पतीचा खून; रागाच्या भरात डोक्यात रॉडने केला वार

बेळगावात पत्नीकडून पतीचा खून; रागाच्या भरात डोक्यात रॉडने केला वार

Published On: Oct 04 2019 6:53PM | Last Updated: Oct 04 2019 6:50PM
बेळगाव : प्रतिनिधी

पत्नीने पतीच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केल्याची घटना शुक्रवारी (ता.४) सायंकाळी साडेचारच्या सुमारास वडगाव येथे घडली. या घटनेत वर्मी घाव लागलेला पती जागीच ठार झाला. किरण शिवाप्पा लोकरे (वय 26 रा. भुवनेश्वर गल्ली लक्ष्मीनगर वडगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की किरण याला दारूचे व्यसन होते तो पिऊन आल्यानंतर पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होत होता. आज तो पिऊन आल्यानंतर नेहमीसारखाच पुन्हा वाद सुरू झाला यातून भांडण जुंपले. घरातील भांडण रस्त्यावर आले आणि दोघे जोरात भांडू लागले. पत्नीला मारण्यासाठी अंगावर गेलेल्या पतीला आवरताना पत्नीने रागाच्या भरात घरातील लोखंडी रॉड आणून पतीच्या डोक्यात घातला.

घाव वर्मी बसल्याने पती रक्तबंबाळ झाला व रस्त्यावर कोसळून जागीच गतप्राण झाला. घटनेची माहिती मिळताच शहापूरचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी आपल्या कुमकसह घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पुढील तपास करत आहेत.