Wed, Sep 23, 2020 20:30होमपेज › Belgaon › पोलिस अधिकारीच कायदा मोडतात तेव्हा..!

पोलिस अधिकारीच कायदा मोडतात तेव्हा..!

Published On: Sep 02 2019 1:29AM | Last Updated: Sep 01 2019 11:26PM
बेळगाव : प्रतिनिधी

नो-पार्किंगमध्ये दुचाकी थांबविल्यास सोळाशे रुपये दंड.., चारचाकी थांबवल्यास दोन हजार रुपयांचा दंड.., पण जर पोलिसांचेच वाहन कायदा पायदळी तुडवत सुमारे अर्धा तास नो?पार्किंगमध्ये थांबल्याचे दिसून आले.

पोलिस आयुक्‍तालयाने टोईंग वाहन आल्यापासून शहरात नो?पार्किंगमध्ये लावलेली वाहने उचलत आहे. नो?पार्किंगमधील वाहनधारकांकडून मोठा दंड आकारण्यात येत आहे. त्यामुळे लोकांत धास्ती आहे. पण, दुसर्‍यांना नियमाचे पालन करण्याची सक्‍ती करण्यार्‍या पोलिस अधिकार्‍यांचेच वाहन नो?पार्किंगमध्ये थांबवत असल्याचा प्रकार उघड होत आहे. कॉलेज रोडवर असलेल्या बस थांब्यासमोरच पोलिस अधिकार्‍याचे वाहन थांबले होते. त्यामुळे बस कुठे थांबणार, असा प्रश्‍नही उपस्थित होत होता. पोलिसांचे वाहनच नो?पार्किंगमध्ये थांबल्यामुळे इतर वाहनेही त्या रांगेत थांबून होती. या प्रकाराबद्दल लोकांत मात्र नाराजी होती.