Sat, Sep 26, 2020 23:36होमपेज › Belgaon › जिल्ह्यातील 14 अर्ज अवैध

जिल्ह्यातील 14 अर्ज अवैध

Last Updated: Nov 19 2019 11:19PM
बेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची मंगळवारी  छाननी झाली. तीन जिल्ह्यांतील तीन मतदारसंघांतील 14 अर्ज अवैध ठरले आहेत. सर्वाधिक 7 अर्ज गोकाक मतदारसंघातून अवैध ठरले. त्यात माजी पालकमंत्री आ. सतीश जारकीहोळी यांचाही अर्ज आहे.

काँग्रेसचा बी-फॉर्म नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. गोकाकमध्ये एकूण 11 अर्ज वैध ठरले. अथणीमध्ये दोन अर्ज अवैध ठरवण्यात आले असून, 16 अर्ज वैध ठरले आहेत. कागवाडमध्ये 5 अर्ज अवैध ठरले असून, 10 अर्ज वैध ठरले आहेत. गोकाकमध्ये रमेश जारकीहोळी (भाजप), लखन जारकीहोळी (काँग्रेस), अशोक पुजारी (निजद),  दीपक कटकधोंड (हिंदुस्थान जनता पार्टी) संतोष नंदूर, अशोक हंजी, गुरुपुत्र कुल्लूर, प्रकाश भागोजी, रामाप्पा कुरबेट, सतीश पुजारी, संजय कुरबेट (सर्व अपक्ष) हे अर्ज वैध ठरले.
अथणी विधानसभा मतदार संघात 18 अर्जांपैकी 2 अर्ज अवैध ठरले. सत्याप्पा बाग्यानावर व अण्णाराय हालळी यांचा समावेश आहे.  एकूण 16 अर्ज वैध ठरले. त्यात गजानन मंगसुळी (काँग्रेस), महेश कुमठळ्ळी (भाजप), गुराप्पा दाशाळ ककमरी (जेडीएस), शहाजहान डोंगरगाव (अपक्ष), नागनाथ व्यंकटराव कलबुर्गी (अपक्ष), दावलसाब नदाफ सिंधगी (राष्ट्रीय महिला पक्ष) सिद्रामगौडा पाटील शेगुनशी, बाहुबली अज्जापगोळ, रवी पडसलगी, रसुलसाब नदाफ, राजू डवरी, इम्राम पटेल, सदाशिव भुटाळे गुरुपत्र कळूर, श्रीशैल हजदमल - (सर्व अपक्ष)  विनायक मठपती (केजीपी) यांचा समावेश आहे. कागवाड विधानसभा मतदार संघात 5 अर्ज बाद झाले असून 10 अर्ज वैध ठरले  आहेत. त्यात श्रीमंत पाटील (भाजप)  राजू कागे (काँग्रेस), श्रीशैल तुगशेट्टी (जेडीएस) सचिन कल्लाप्पा अलगुरे (उत्तमप्रजाकीय पक्ष) मुरग्याप्पा देवरड्डी , दीपक बुर्ली मायनट्टी , अर्चना गणपती मोरे, संदीप कांबळे (सर्व अपक्ष),  विवेश शेट्टी, (बहुजन वंचित आघाडी), अमोल सरडे (अपक्ष) यांचा समावेश आहे. 

 "