Mon, Jan 18, 2021 09:47होमपेज › Belgaon › बेळगाव : अखेर बारावीचा निकाल लागला  

बेळगाव : अखेर बारावीचा निकाल लागला  

Last Updated: Jul 14 2020 2:42PM

संग्रहित छायाचित्रबेळगाव : पुढारी वृत्तसेवा 

कोरोनामुळे रखडलेला बारावीचा निकाल अखेर पदवीपूर्व शिक्षण खात्याने मंगळवारी जाहीर केला. बेळगाव विभागाचा निकाल ५९.७ तर चिकोडी शैक्षणिक विभागाचा ६३.८८ टक्के निकाल लागला आहे. राज्यात चिकोडीचा २० वा क्रमांक तर बेळगावचा २७ वा क्रमांक लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावषी बेळगाव व चिकोडी या दोन्ही शैक्षणिक जिल्ह्यांच्या टक्केवारीत वाढ झाल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.

मंगळवारी सकाळी ११.३० वाजता पदवीपूर्व शिक्षण खात्याने ऑनलाईन निकाल जाहीर केला. यामध्ये उडुपी जिल्हा प्रथम क्रमांकावर, दक्षिण कन्नड द्वितीय क्रमांकावर आहे.