Wed, Aug 12, 2020 12:08होमपेज › Belgaon › तीन कारची विचित्र धडक

तीन कारची विचित्र धडक

Published On: Dec 18 2017 2:29AM | Last Updated: Dec 17 2017 10:32PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

शनिवारी रात्री भरधाव  निघालेल्या हुंडाई कारचालकाने ट्रकला ओलांडताना थांबलेल्या स्विफ्ट कारला धडक दिली. त्यानंतर ह्युंडाई कार दुभाजकाला जाऊन धडकली. अचानक घडलेल्या अपघातात निघालेल्या तिसर्‍या  कारने ह्युंडाई कारला धडक दिली. कॉलेज रोड मार्गावर घडलेल्या तिहेरी अपघाताने काही काळ खळबळ उडाली 

शनिवारी रात्री 11 च्या सुमारास संभाजी चौकाकडून कॉलेज रोड मार्गे निघालेल्या एका कारने लिंगराज कॉलेज चौकादरम्यान ट्रकला ओलांडताना थांबलेल्या दुसर्‍या कारला धडक दिली. नियंत्रण गमाविलेल्या चालकाची ती कार दुभाजकाला जाऊन धडकली. याच वेळी मागून येणार्‍या तिसर्‍या कारने पहिल्या कारला धडक दिली. 

काही क्षणात तिहेरी अपघात घडला. सरदार्स मैदानावर शरीरसौष्ठव स्पर्धा पाहून कॉलेजमार्गे निघालेल्या वाहनधारकांत खळबळ उडाली. अपघाताची दक्षिण रहदारी पोलिस ठाण्यात रविवारी सायंकाळपर्यंत नोंद झाली नव्हती.