Thu, Sep 24, 2020 06:13होमपेज › Belgaon › ट्रकने तिघांना उडवले; एक ठार

ट्रकने तिघांना उडवले; एक ठार

Published On: Oct 07 2019 1:59AM | Last Updated: Oct 07 2019 1:08AM
बेळगाव : प्रतिनिधी
रस्त्याकडेने जाणार्‍या तिघा पादचार्‍यांना ट्रकने उडवल्यानंतर एकट्याचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी आहेत. 

पिरनवाडी दर्गाह येथे शनिवारी सायंकाळी हा अपघात झाला होता. जखमीचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी मृत्यू झाला. सिद्राय लक्ष्मण नायक (वय 23 रा. हुंचेनट्टी) असे मृताचे नाव आहे. अपघातात दोघे जखमी झाले आहेत. 

शनिवारी रात्री आठच्या दरम्यान पिरनवाडी येथे रस्त्याकडेने जाणार्‍या तिघा पादचार्‍यांना भरधाव ट्रकने उडवले. शंकरगौडा दोडगौडा पाटील (वय 28), नागेेश कल्‍लाप्पा तळवार (24, तिघेही रा. हुंचेनट्टी) हे जखमी आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सिद्रामची स्थिती गंभीर होती. त्याला अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपयोग झाला नाही.  दोघा जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे. ट्रक बेळगावकडून जांबोटीकडे जात होता. अपघातानंतर ट्रकचालकाने ट्रकसह पलायन केले.