Fri, Jul 03, 2020 00:55होमपेज › Belgaon › बहिणीला वाचवताना भावाचाही बुडून मृत्यू

बहिणीला वाचवताना भावाचाही बुडून मृत्यू

Last Updated: Jun 07 2020 12:23AM
संबरगी : पुढारी वृत्तसेवा 

शेततळ्यामध्ये पोहण्यास गेलेल्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी सकाळी सकाळी 11 च्या सुमारास घडली. अथणी तालुक्यातील गुंडेवाडी  येथील पारिस नेमीनाथ  कुपवाड (वय 15), सनमती नेमीनाथ कुपवाड (वय 13) हे दोघे बहीण-भाऊ शाळेला सुट्टी असल्यामुळे देवनूर रस्त्याला कुपवाडे यांच्या मळ्यातील घराच्या पाठीमागे असलेल्या शेततलावामध्ये पोहण्यास गेले होते. पारिस बहिणीला पोहण्यास शिकवत होता; पण बहिणीच्या कमरेला बांधलेली दोरी तुटली. 

त्यामुळे सनमती बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी पारिस धावला. पण सनमतीला बाहेर आणणे पारिससाठी अशक्य ठरले आणि दोघांचा बुडून मृत्यू झाला. दोघे अजून का आले नाहीत हे पाहण्यासाठी मळ्यातील नातेवाईक तलावावर गेले असता, त्यांना मृतदेह आढळून आले. 

घटनेची माहिती मिळताच अथणीचे पीएसआय कुमार हडकर यांनी भेट देऊन पंचनामा केला. अथणी शासकीय रुग्णालयात मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.  या दोघांच्या मृत्युमुळे गावात शोककळा पसरली. अथणी पोलिसस्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.