Sat, Mar 28, 2020 16:50होमपेज › Belgaon › बेळगाव : हेब्बाळ डॅममध्ये सापडला मृतदेह

बेळगाव : हेब्बाळ डॅममध्ये सापडला मृतदेह

Last Updated: Feb 20 2020 1:38PM

हेब्बाळ डॅममध्ये सापडला अनोळखी मृतदेहखानापूर (बेळगाव) : पुढारी वृत्तसेवा

खानापूर (जि. बेळगाव) तालुक्यातील नंदगड गावाजवळ असलेल्या हेब्बाळ डॅममध्ये आज सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या अंगावर शर्ट पॅन्ट आणि पायात बूट असल्याने ही आत्महत्या आहे की हत्या यांचा तपास नंदगड पोलिस करत आहेत.  

हेब्बाळ डॅमच्या पाण्यात मृतदेह तरंगत असल्याचे काही जणांच्या निदर्शनास आले. सकाळपासून गावात या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह पाण्याबाहेर काढून ओळख पटविण्याचे काम सुरू केलं आहे. 

वाचा : पुणे : ताम्हिणी घाटातील अपघातात ३ ठार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे वय अंदाजे  ३५ ते ४० वर्षे असून त्याने अंगावर पांढरे शर्ट आणि काळी पॅन्ट परिधान केली आहे. तसेच पायात काळे बूट घातले आहे. यामुळे त्याने आत्महत्या केली आहे की त्याचा खून झाला आहे याबाबतचा तपास पोलिस करत आहेत. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांच्या तपासाला दिशा मिळणार आहे.

वाचा : ...तर बस गेली असती दरीत