Sat, Jul 04, 2020 15:02होमपेज › Belgaon › क्‍वारंटाईन असूनही  प्रवास! तापाची लक्षणे दिसल्यामुळे तारांबळ

क्‍वारंटाईन असूनही  प्रवास! तापाची लक्षणे दिसल्यामुळे तारांबळ

Last Updated: May 22 2020 1:32AM
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

बस प्रवास सुरू झाल्यामुळे त्याचा काहीजण गैरवापर करत असल्याचे आढळून आले आहे. हातावर क्‍वारंटाईनचा शिक्‍का असतानाही प्रवासासाठी बाहेर पडलेल्या तिघांना आज ताब्यात घेऊन पुन्हा क्‍वारंटाईन करण्यात आले. हे तिघेही महाराष्ट्रातील असून पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.मध्यवर्ती बस्थानकावर तैनात एका पोलिसाच्या दक्षतेमुळे ते तिघे सापडले. त्यापैकी एकाला तीव्र ताप असल्याचे तपासणीत आढळून आले. त्या तिघांनाही खानापूर तालुक्याच्या हद्दीवरील बडस गावी जायचे होते त्यासाठी बसच्या शोधात ते स्थानकावर गेले होते हे चौकशीत स्पष्ट झाले.

विटा, पुणे येथून दोघे आले असून, तिसराही महाराष्ट्रातील आहे; पण त्याचे गाव समजू शकले नाही. तिसर्‍यात कोरोनाची लक्षणे आढळून आल्यामुळे रुग्णवाहिका बोलावून त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलेे. त्यांना क्‍वारंटाईन करण्यात येणार आहे. मार्केट पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल एच. बी. मडीवाळर यांच्या दक्षतेमुळे ते तिघे सापडले. या प्रकारामुळे बसस्थानकावर काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मंगळवारपासून बेळगावसह राज्यभरात बससेवा सुरू झाली आहे.

त्यामुळे अनेकजण बसमधून इच्छित ठिकाणी जाण्याच्या प्रयत्नात आहेत. बसप्रवासाठी काही नियम पाळण्याची सूचना प्रवाशांना देण्यात आली आहे. पण क्वारन्टाईनचा शिक्का असलेले काहीजन बसप्रवास करीत आहेत. त्यामुळे आता परिवहन मंडळालाही विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे.