Wed, Jan 27, 2021 09:38होमपेज › Belgaon › खानापुरात ट्रॅफिक जॅम; पोलिसांचे दुर्लक्ष

खानापुरात ट्रॅफिक जॅम; पोलिसांचे दुर्लक्ष

Published On: Apr 22 2018 1:11AM | Last Updated: Apr 21 2018 11:58PMखानापूर : वार्ताहर

विधानसभा निवडणूक काळात  शिवस्मारक सर्कल व जांबोटी क्रॉस सर्कल आदी ठिकाणी  नेहमी ट्रॅफिक जॅम ची समस्या उद्भवत आहे. परिणामी नागरीकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
निवडणुकीच्या काळात शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी याठिकाणी कायमस्वरुपी ट्रॅफिक पोलीसाची नेमणूक करण्याची गरज आहे. तालुक्यात  वाहतूक वाढल्याने शहरांतर्गत महामार्गावरील वाहनांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. शिवस्मारक सर्कलमध्ये वाहतुकीची कोंडी नेहमीचीच ठरलेली आहे. 

दोन्ही बाजूनी ट्रॅफिक जाम होत असल्याने पादचार्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामूळे खानापूर पोलिसांनी वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपायोजना करण्याची गरज आहे.पोलिस स्थांनकातील एकही पोलिस  शिवस्मार सर्कल मध्ये ट्रॅफिकला शिस्त लावण्यासाठी नसतो. यामूळे वाहनधार रोड वरच आपली वाहने लावतात. स्टेशनरोडवरही एका बाजुने दुचाकी लावण्यात येत नसल्याने  मोठी समस्या निर्माण होत आहे. त्यातच फुटपाथवर फेरीवाल्यांनी ठाण मांडल्याने परिस्थिती आणखिनच बिघडली आहे. शहराच्या बिघडलेल्या वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी या ठिकाणी पोलिसाची नेमणुक करावी अशी मागणी होत आहे.

Tags : Belgaum, Traffic, jam, Khanpur, Neglect, Police