Sun, Sep 27, 2020 00:53होमपेज › Belgaon › नेहरूनगरात चोराचा तिघांवर चाकू हल्ला

नेहरूनगरात चोराचा तिघांवर चाकू हल्ला

Published On: Apr 07 2019 1:43AM | Last Updated: Apr 07 2019 1:43AM
बेळगाव ः प्रतिनिधी  

घरातील मोबाईल चोरी करून पळून जाणार्‍या चोरट्याला पकडताना चोरट्याने तिघाजणांवर चाकू हल्ला केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री नेहरूनगर येथे घडली. यामध्ये सत्यप्रकाश पुरषोत्तम शर्मा (वय 26), देवेंद्रकुमार रामकेश दीक्षित (वय 25), सत्यप्रकाश रामकेश दिक्षीत (वय 30, सर्व रा. नेहरूनगर, मूळचे राजस्थान) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. 

मूळचे राजस्थानचे असणारे दीक्षित नेहरूनगर येथे वास्तव्यास आहेत. ते आईस्क्रिम व उसाचा रस विक्री करण्याचा व्यवसाय करतात. शुक्रवारी रात्री 3.30 च्या सुमारास त्यांच्या खोलीमध्ये अनोळखी व्यक्तीने प्रवेश करून खोलीमधील मोबाईल घेऊन पळ काढला. इतक्यात खोलीत झोपलेल्या सत्यप्रकाश याला आवाज आला. लागलीच त्याने पळून जाणार्‍या चोरट्याचा पाठलाग करून गाठले व त्याच्याकडील मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्याने आरडाओरड केली. इतर सहकारीही जागे झाले. दरम्यान, चोरट्याने आपल्याकडील चाकूने तिघांवर हल्ला केला. काही जणांचा चावाही घेतला. मात्र चोरट्याला सोडण्यात आले नाही. घटनेची माहिती एपीएमसी पोलिसांना दिली. पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेतले आहे.