Sat, Feb 29, 2020 17:39होमपेज › Belgaon › गांजा विकणार्‍या तिघांना अटक

गांजा विकणार्‍या तिघांना अटक

Published On: Mar 25 2018 1:46AM | Last Updated: Mar 25 2018 1:06AMबेळगाव : प्रतिनिधी

चिकोडी पोलिस स्थानकाच्या व्याप्तीत येणार्‍या जागनूर गावामध्ये सीआयडी पोलिसांनी छापा टाकून गांजा विकणार्‍या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून 39 हजार 750 रु. किमतीचा 2 किलो 650 ग्रॅम, गांजा व 1300 रू.जप्त केले. 

बेळगाव सीआयडी विभागाचे पोलिस निरीक्षक श्रीधर सातारे यांच्या नेतृत्वामध्ये ही कारवाई करण्यात आली. सदाशिव अण्णाप्पा चिंचली (वय 55, रा. जागनूर, ता. चिकोडी), गिरीमल अडव्याप्पा कांबळे (वय 60, रा. पोगत्यानट्टी, ता. चिकोडी), बिराप्पा इराप्पा हेसळगुंदी (वय 50, रा. विजयनगर, ता. चिकोडी), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

पोलिसांना खबर्‍यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. एनडीसी आणि सीआयडी बेळगाव विभागाचे आर. बी. गडवीर, जे. एम. बागण्णावर, जी. आर. शिरसंगी आणि चिकोडी पोलिस स्थानकाचे एस. एल. होगार या कर्मचार्‍यांनी या कारवाईत भाग घेतला. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर चिकोडी पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

 

Tags : belgaon, belgaon news, crime, ganja selling, Three arrested,