Sun, Oct 25, 2020 08:16होमपेज › Belgaon › राज्यात उच्चांकी 57 बळी

राज्यात उच्चांकी 57 बळी

Last Updated: Jul 11 2020 1:23AM
बंगळूर : राज्यात दिवसभरात 

सलग तिसर्‍या दिवशी दोन हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले. शुक्रवारी 2313 रुग्णांची भर पडली. एकूण रुग्णसंख्या 33418 झाली. गेल्या चोवीस तासांत आतापर्यंतच्या सर्वाधिक 57 कोरोना मृत्यूंची नोंद झाली. यामुळे एकूण कोरोनाबळीचा आकडा 543 झाला. गेल्या चोवीस तासांत 1003 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे एकूण 13836 जण कोरोनामुक्‍त झाले आहेत. बंगळूर शहर जिल्हा 1147, मंगळूर 139, विजापूर 89, बळ्ळारी 66, गुलबर्गा 58, यादगिरी 51, म्हैसूर 51, धारवाड 50, हावेरी 42, उडपी 34, कारवार 33, कोडगू 33, मंड्या 31, रायचूर 25, रामनगर 23, दावणगिरी 21, बिदर 19, गदग 19, बेळगाव 15, चिक्‍कबळ्ळापूर 12, तुमकूर 10, कोलार 9, चामराजनगर 

मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा क्‍वारंटाईन

मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे गृह कार्यालय कृष्णा येथील काही कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याने मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी होम क्‍वारंटाईन राहणार असल्याचे कळवले आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. काही कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली असून घरातूनच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काही सूचना देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील टेलिफोन ऑपरेटर, दोन एस्कॉर्ट, स्वयंपाकी, कारचालकासह दहाजणांना कोरोनाची लागण झाली आहे.

 "