Tue, Jan 19, 2021 23:17होमपेज › Belgaon › शेतकर्‍यांनी आधुनिकता स्वीकारण्याची गरज

शेतकर्‍यांनी आधुनिकता स्वीकारण्याची गरज

Published On: Apr 20 2018 1:17AM | Last Updated: Apr 19 2018 8:52PMखानापूर : राजू कुंभार

सध्या शेती व्यवसायासमोर उद्योगधंद्याप्रमाणे नवी आव्हाने उभी आहेत. खुल्या अर्थव्यवस्थेमुळे शेतीमालाला योग्य भाव,  साठेबाजी यासारख्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. यातच सुका-ओला  दुष्काळ, उपासमारी यामुळे शेतकर्‍यांच्या समस्यांमध्ये वाढ  झाली आहे. शेतीच्या विकासासाठी सरकारने शेतीसाठी विविध योजना आखण्यापासून ते शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प असावा इथपर्यंत तज्ज्ञांची चर्चा झाली. मात्र जागतिकीकरणाच्या रेट्यात सक्षमपणे उभे राहायचे  शेतकर्‍यांनी आधुनिकता स्वीकारण्याची गरज आहे.

तालुक्यात मोठ्याप्रमाणात आर्थिक पिके घेतली जातात. भात, रताळी आणि बटाटा यासारखी पिके येथील शेतकर्‍यांना मोठे आर्थिक उत्पन्न मिळवून देतात. मात्र कृषीमालाच्या दरावरुन होणारा वाद  आणि दलालांच्या वर्चस्वामुळे शेतकर्‍यांना आर्थिक स्थैर्य मिळाले नाही. त्यामुळे आजही येथील शेतकर्‍यांची परिस्थिती दयनीय आहे. 

स्वातंत्र्यानंतर देशात पंचवार्षिक योजना राबविण्यात आल्या.  मात्र त्यातल्या  कोणत्याही योजनेत अथवा अर्थसंकल्पात शेतीसाठी म्हणावी तशी तरतूद करण्यात आली नाही. विकासाच्या नावाखाली मात्र उद्योगधंद्यांना भरपूर मदत झाली. उद्योगधंदे मोठ्याप्रमाणात उभारले गेले. सध्याची परिस्थिती आर्थिक सक्षम असल्याप्रमानणे  वाटत असली तरी आजही निम्म्याहून अधिक जनता परंपरागत शेती व्यवसायात असून त्यांची प्रगती खुंटलेली आहे.

त्यांच्या विकासासाठी ठोस योजना न झाल्याने शेतकर्‍यांच्या सात-बारा उतार्‍यांचे रकाने कर्जाच्या बोजाने भरले आहेत. मात्र या सर्वाला राजकीय परिस्थिती, शासनाचे धोरण जबाबदार आहेत असे म्हणता येणार नाही. तर तेवढीच शेतकर्‍यांची शेतीविषयीची मानसिकता जबाबदार आहे. शेतकर्‍यांमध्ये व्यावसायिकतेचा अभाव असल्याने शेतीमाला योग्य हमीभव मिळवून घेने त्यांच्याकडून आजपर्यंत शक्य झाले नाही. शेतकर्‍यांना सिंचनाचे अनेक पर्याय उपलब्ध झाले असलेतरी पाण्याचा कसा व किती प्रमाणात वापर करावा, कोणते पीक घ्यावे व कोणती बाजारपेठ शोधावी याचे तारतम्य नसल्याचे दिसून येते. यामुळे उत्पादनापेक्षा खर्चाचे प्रमाण जास्त अशी स्थिती बहुतांश शेतकर्‍यांबाबत आहे. ज्याप्रमाणे पाण्याअभावी खरीप पिके वाळून जात आहेत. त्याप्रमाणेच पाण्याच्या अतिवापराने जमीन क्षारपड होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. शेकडो एकर जमीन वर्षातील बहुंताश काळासाठी पडून राहते. परिणामी हातात काम नसल्याने व्यसनाधिनता, जुगार यामध्ये शेतकरी अडकण्याच्या प्रमाणातदेखील वाढ होत आहे. 

अरब राष्ट्रांच्या धर्तीवर पाण्याच्या कमी वापरात सेंद्रिय शेती करण्याचे तंत्र शेतकर्‍यांनी अवलंबिले पाहिजे. तरच शेतीव्यवसायाला चांगले दिवस येणे शक्य होणारआहे. कृषी खात्याकडून देण्यात येणार्‍या सवलतींचा वापर करताना गरजू शेतकर्‍यांनाही शासनाच्या सुविधांची ओळख करुन देने हे प्रत्येक शेतकर्‍याने कर्तव्य समजावे. तरच शेतीव्यवसायाला बळकटी प्राप्त होणार आहे. -विनायक सावंत  प्रगतशील शेतकरी

बँकांकडून सवलतीच्या दरात आणि कृषीपत्तीन संस्थांमार्फत शून्य टक्के व्याजदराने शेतकर्‍यांना कर्ज देण्यात येत आहे. मात्र घेतलेल्या कर्जाचा वापर शेतीची प्रगती साधण्यासाठी न होता इतर अनावश्यक गोष्टींवर होताना दिसतो.  कर्जाचा विनियोग व्यवसथित न झाल्याने शेतकर्‍यांवर कर्जाचा डोंगर वाढतो. यातून आत्महत्येसारख्या घटना घडत आहेत.  शेतीपूरक व्यवसाय आणि शेतीत ाधुनिक उपकरणे आदींसाठी  कर्जाचा वापर करणे आवश्यक आहे.  -पुंडलिक कारलगेकर माजी जि. पं. सदस्य