Sat, Feb 22, 2020 09:47होमपेज › Belgaon › पोटनिवडणुकीनंतर भाजपवर संकट

पोटनिवडणुकीनंतर भाजपवर संकट

Last Updated: Nov 17 2019 1:22AM
बंगळूर : प्रतिनिधी

पोटनिवडणुकीत भाजपच्या आठ जागाही निवडून येणार नाहीत. त्यामुळे निवडणुकीनंतर येडियुराप्पा यांचे सरकार संकटात येणार असून संख्याबल घटणार आहे, असा दावा माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे.

शनिवारी (दि. 16) पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कशाही पद्धतीने ही पोटनिवडणूक जिंकणे येडियुराप्पा यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा ते हाताळत आहेत; पण मतदार जागृत आहे. हुणसूर येथे भाजप उमेदवार सी. पी. योगेश्‍वर यांचे छायाचित्र असलेल्या साड्या सापडल्या आहेत. तरीही निवडणूक अधिकारी आणि स्थानिक प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. अपात्र आमदार स्वार्थी होते म्हणूनच ते पक्षातून  बाहेर गेले आहेत. त्यांना आता जनताही चांगलाच धडा शिकवेल. न्यायालयाचा निकाल आल्यानंतर आता एकेकजण ऑपरेशन कमळबाबत बोलत आहेत. पण, ते कोणत्या कारणासाठी अपात्र ठरले. याची माहिती जनतेला आहे. त्यामुळे त्यांनी अधिक हवेत राहण्याची गरज नाही. रमेश जारकीहोळी यांच्या शब्दाला किंमत नाही. ते अपात्र असल्यामुळेच कशाही पद्धतीने बोलत सुटले आहेत, अशीही टीका सिद्धरामय्या यांनी केली.