Thu, Sep 24, 2020 06:16होमपेज › Belgaon › शिवसेना जिल्हाप्रमुखांचाच बंगला चोरट्यांनी फोडला

शिवसेना जिल्हाप्रमुखांचाच बंगला चोरट्यांनी फोडला

Published On: Dec 05 2017 1:48AM | Last Updated: Dec 04 2017 11:46PM

बुकमार्क करा

निपाणी : प्रतिनिधी

शिवसेनेचे बेळगाव जिल्हाप्रमुख बाबासाहेब खांबे यांचा बंगला चोरट्यांनी फोडला आहे. रोख रकमेसह काही महत्त्वाच्या वस्तू चोरीला गेल्याची माहिती खांबे यांनी दिली.

गेल्या दोन महिन्यांपासून निपाणीत दिवसागणिक घरफोडींसह चोरीच्या घटना सुरू असून, चोरांनी कहर केला आहे. या टोळीला पकडण्यास निपाणी पोलिस अपयशी ठरले आहेत. खांबे याचा शारदा निवास बंगला चक्क पोलिस स्थानकाच्या समोरील दिवेकर कॉलनीत आहे. आठ दिवसांपूर्वी ते बंगल्यास कुलूप लावून कोल्हापूरला गेले होते. याचा फायदा घेऊन रात्री चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. आतील दोन तिजोर्‍या फोडून त्यामधील किमती ऐवज व वस्तूंची चाचपणी केली. यावेळी चोरट्यांना कोणताही ऐवज मिळून आला नाही; मात्र महत्त्वाच्या काही वस्तू तसेच रोख 15 हजार घेऊन पोबारा केला.

याची माहिती खांबे यांना नातेवाईकांनी दिली. त्यानंतर खांबे यांनी घरी येऊन पाहणी केली. तसेच पोलिसांना कळवले. तशी त्यांनी पोलिस डायरीत रविवारी कच्ची नोंदही केली. तरीही निपाणी चोरीचे थांबत नसल्याने हे पोलिसांचे अपयश असल्याचे खांबे यांनी सांगितले.