Thu, Sep 24, 2020 06:33होमपेज › Belgaon › शहरात विसर्जनासाठी 29 ठिकाणी फिरते कुंड

शहरात विसर्जनासाठी 29 ठिकाणी फिरते कुंड

Published On: Sep 03 2019 1:43AM | Last Updated: Sep 02 2019 9:03PM
बेळगाव : प्रतिनिधी

शहर, परिसरात पीओपी मूर्तींची प्रतिष्ठापना बंद करण्यास अयशस्वी ठरलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळासह इतर पाच संस्थांनी घरगुती गणरायाच्या विसर्जनासाठी फिरत्या कुंडाची सोय केली आहे. गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी म्हणजे 6 सप्टेंबर रोजी शहरात 29 ठिकाणी विसर्जन कुंड फिरणार आहे.

दरवर्षी कर्नाटक प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिकेकडून फिरत्या विसर्जन कुंडाची सोय करण्यात येते. यंदा गृह निर्माण मंडळ, बेळगाव नगरविकास प्राधिकरण (बुडा) आणि कॅण्टोन्मेंट बोर्डाकडून फिरत्या विसर्जन कुंडांची सोय करण्यात आली आहे.

सर्व संस्था वेगवेगळ्या मार्गावर विसर्जन कुंड फिरवणार असून  लोकांना वाहनात घरगुती गणेश मूर्ती विसर्जित करण्याचे आवाहन करणार आहेत. पीओपी मूर्तीमुळे जलप्रदूषण टाळण्यासाठी आणि पाण्याचे स्रोत प्रदूषित होऊ नये, यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 ते 8 या काळात ही वाहने फिरणार आहेत.

वाहनांची सोय या ठिकाणी

* महापालिका

भाग्यनगर पाचवा क्रॉस, पहिले रेल्वे फाटक, जुना धारवाड रोड धाकोजी रुग्णालयाजवळ, बसवेश्‍वर चौक, खासबाग, सुभाष मार्केट, हिंदवाडी, विश्‍वेश्‍वरय्या बसस्थानक, टिळक चौक, रामलिंगखिंड गल्‍ली.

* कर्नाटक प्रदूषण नियंत्रण मंडळ

रामतीर्थनगर, शिवालय, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, महांतेशनगर, डॉ. स.ज. नागलोतीमठ निवासस्थान, बॉक्साईट रोड, हनुमाननगर चौक, चन्‍नम्मानगरमधील एसबीआय बँकेजवळ, व्हॅक्सिन डेपो लेले मैदानाजवळ, श्रीनगर उद्यान, साईबाबा देवस्थान, वंटमुरी कॉलनी, शाहुनगर शेवटचा बस थांबा, हरिमंदिर, अनगोळ.
 
* कर्नाटक गृहनिर्माण मंडळ

कणबर्गी सिद्धेश्‍वर देवस्थान रस्ता, देवराज अर्ज कॉलनी, हिंडलगा झोपडपट्टी सुधारणा मंडळ कार्यालय, सह्याद्रीनगर पाणी टाकी.

* कॅण्टोन्मेंट बोर्ड
बेळगाव किल्‍ला, कॅम्प पोलिस ठाण्याजवळ, लक्ष्मी टेकडी, लक्ष्मी देवस्थानाजवळ, इस्लामिया शाळेजवळ, जुन्या पोस्ट कार्यालयाजवळ.

* बुडा
रामतीर्थनगर शिवालयाजवळ, कुमारस्वामी लेआऊट, ऑटोनगर.