Sat, Feb 29, 2020 13:04होमपेज › Belgaon › आणखी 15 पीडीओंचे निलंबन 

आणखी 15 पीडीओंचे निलंबन 

Last Updated: Nov 07 2019 1:51AM
बेळगाव : प्रतिनिधी

ग्रामपंचायतीत गैरव्यवहार प्रकरणात दोषी आढळलेल्या 15 पीडीओंना (पंचायत विकास अधिकारी) निलंबित केले. जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र के. व्ही. यांनी तसा आदेश बजावला आहे. 

यापूर्वी 6 पीडीओंना निलंबित केले असून, आता पुन्हा 15 पीडीओंना घरचा रस्ता दाखवला आहे. अजून काही जणांवर कारवाईची टांगती तलवार असल्याचे त्यांनी सांगितले. बेकायदा ले?आऊट करणे, उतारे देणे, नाव नोंदणी करणे आदी गैरव्यवहारप्रकरणी पीडीओंविरोधात तक्रारी आल्या होत्या. त्याची शहानिशा करण्यासाठी सीईओ राजेंद्र यांनी दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील 28 पीडीओंना नोटीस बजावली होती. त्यामध्ये 15 पीडीओ दोषी आढळले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बुधवारी निलंबनाची  कारवाई करण्यात  आली. गेल्या आठवड्यात सहा जणांवर कारवाई झाली असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

बेळगाव तालुक्यातील 11 ग्रामपंचायती बेळगाव शहरविकास प्राधिकरणाच्या अखत्यारित आहेत, तर जिल्ह्यातील 27 ग्रामपंचायती नगरविकास प्राधिकरणाकडे आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींना एन-ए, ले?आऊट करण्याचा अधिकार नाही. तरीही अनेक पीडीओंनी बेकायदा एन?ए, ले?आऊट केल्याचे आढळून आहे. बेकायदा संगणकीय उतारे काढून दिले. शिवाय, बेकायदा नावे नोंद केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर याची चौकशी करण्यासाठी सीईओ राजेंद्र यांनी समिती स्थापन केली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली. सीईओ राजेंद्र यांच्या कारवाईमुळे पीडीओवर्गात एकच खळबळ माजली आहे.