Tue, Jan 19, 2021 22:51होमपेज › Belgaon › बंगळूरसाठी खास एटीएस

बंगळूरसाठी खास एटीएस

Last Updated: Oct 16 2019 1:12AM
बंगळूर ः प्रतिनिधी

जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश  या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी कर्नाटकात घुसल्याची माहिती राष्ट्रीय तपास पथकाने दिल्यानंतर बंगळूरपुरते मर्यादित दहशतवादविरोधी पथक स्थापन केले जाणार आहे. याविषयी गांभीर्याने पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री बसवराज मुंबई यांनी दिली.

मंगळवारी ते पत्रकारांशी बोलत होते. बंगळुरात 20 ते 22 ठिकाणी दहशतवाद्यांनी आश्रय घेतल्याचा संशय आहे. एटीएस स्थापन करून एक नोव्हेंबरपासून धडक कारवाईला सुरुवात होईल. मोक्याच्या ठिकाणी कडेकोट

 पोलिस बंदोबस्त करण्याची सूचना दिली आहे. रेल्वे, बस स्थानक, बाजारपेठ आदी गर्दीच्या ठिकाणी संशयास्पदरित्या फिरणार्‍या व्यक्तींवर नजर ठेवण्यात आली आहे. संशयास्पद वस्तूपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संशयित व्यक्ती फिरत असेल तर तिची चौकशी केली जाईल. याबाबतच्या सूचना सर्व पोलिस अधिकार्‍यांना दिल्या आहेत. पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात एक सायबर सेल कार्यरत आहे. आता सर्व डीसीपी कार्यालयात सायबर सेल स्थापन करण्यात येणार आहे. डीसीपी या सेलचे प्रमुख असतील अशी माहिती माहितीही गृहमंत्र्यांनी दिली.

संवेदनशील बेळगावचे काय?

काही महिन्यांपूर्वी बेळगावात बेकायदेशीरपणे बांगलादेशी राहत असल्याचे उघड झाले होते. काही जणांना अटकही करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. विविध घटनांचा विचार केल्यास बेळगाव नेहमीच संवेदनशील राहिले आहे. याठिकाणीही दहशतवादविरोधी पथक स्थापन करण्याचा विचार या आधीच्या सरकारने केला होता. आता एन. आय.ए.ने दिलेल्या इशार्‍यानंतर बेळगावात आवश्यक खबरदारीची गरज आहे.