Thu, Feb 20, 2020 20:06होमपेज › Belgaon › तरुणाला शॉक; एकाला अटक 

तरुणाला शॉक; एकाला अटक 

Published On: Jun 27 2019 1:31AM | Last Updated: Jun 27 2019 12:05AM
बेळगाव : प्रतिनिधी

प्रेमप्रकरणातून तरुणाचे अपहरण करुन तरुणीच्या कुटुंबीयांकडून शॉक  देण्यात आला होता. याप्रकरणी जखमी तरुण मडिवाळ रायबागकर यांच्या कुटुंबीयांनी  माळमारुती पोलिस स्थानकात तक्रार  दाखल केली होती. यावरुन माळमारुती पोलिसांनी अप्पासाब बाबाजान नदाफ (वय 26 रा. धारवाड ) याला अटक केली आहे. 

गरग (ता.धारवाड)  येथील मडिवाळ अशोक रायबागकर (वय 26) या तरुणाचे गावातीलच युवतीशी प्रेमसंबंध होते. यातून युवतीच्या कुटुंबीयांकडून धमकी देऊन त्रास देण्यात आला होता. त्यामुळे सदर तरुणाने गाव सोडले होत. तो गांधीनगरमधील मारुतीनगर येथे वास्तव्यास होता. 

दरम्यान, तरुणीच्या कुटुंबीयांकडून मडिवाळ रायबागकर याला संशयावरुन पुन्हा त्रास देण्यात येत होता. त्याचे अपहरण करुन त्याला विजेचा शॉक देण्यात आला होता. यात त्याच्या दोन्ही किडणी निकामी झाल्या आहेत. याप्रकरणी  माळमारुती पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकाणी पोलिस निरीक्षक बी.आर गड्डेकर यांच्या नेतृत्वामध्ये तपास हाती  घेण्यात आला होता. धारवाड येथे तपास पथकाने कारवाई करुन संशयित  अप्पासाब नदाफला अटक केली. संशयित नदाफची जिल्हा रुग्णालयात तपासणी करुन न्यायालयात हजर करण्यात आले आहे.