Mon, Jan 18, 2021 09:43होमपेज › Belgaon › मेंढ्यांच्या शर्यती : झुंज देण्यास सज्ज

मेंढ्यांच्या शर्यती : झुंज देण्यास सज्ज

Published On: Mar 17 2018 1:15AM | Last Updated: Mar 16 2018 8:54PMबेळगाव : महेश पाटील

उत्तर कर्नाटक आणि  विशेष करून बेळगाव, विजापूर आणि बागलकोट जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मेंढ्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात येते. मध्यंतरी विविध शर्यतींवर सर्वोच्चन्यायालयाने बंदी घातल्याने या  शर्यतीपासून सर्वसामान्य जनता आणि शेतकरी दुरावला होता. मात्र आता या शर्यतींना प्रारंभ झाल्याने खेडे गावांमध्ये मेंढ्यांच्या टक्करी आणि शर्यती सुरू झाल्या आहेत.

यरगट्टी, मुधोळ, बैलहोंगल, गोकाक, कित्तूर, रामदुर्ग आदी परिसरात गेल्या कित्येक वर्षापासून शेतकरी या स्पर्धांचे आयोजन करतो. या भागात पालन करण्यात येणार्‍या बकरी आणि मेंढी यांना विशेष स्थान आहे. यामुळे प्रत्येकी ठिकाणी मुधोळचे मंढे आहेत का? असा प्रश्‍न उपस्थित केला जातो. 

बागलकोट जिल्ह्यातील येळेगुड्ड येथील रहिवासी आणि सध्या बेळगागवमध्ये वास्तव्यास असलेल्या मरियण्णा रत्नाकर कुरी यांनी अशाप्रकारच्या विविध बकर्‍यांचे संगोपन केले आहे. गेल्या 25 वर्षापासून त्यांनी देशभरातील विविध बकर्‍यांच्या संगोपनास प्रारंभ केला असून आपल्या आवडीनुसार विविध ठिकाणी होणार्‍या ग्रामीण भागातील जत्रा महोत्सवामध्ये ठग्गरांच्या स्पर्धेसाठी ते सहभागी होतात. 

आतापयर्ंत विविध ठगरांच्या स्पर्धेत सहभागी होऊन त्यांनी 15 हून अधिक ठिकाणी स्पर्धा जिंकली आहे. मरियण्णा रत्नाकर कुरी यांच्याकडे देशभरातील विविध प्रकारच्या 8 प्रजाती उपलब्ध आहेत. या ठग्गरांचे पालन पोषण करताना ते कोणावर हल्ला करणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागते.

कळपात फिरतानाही प्राण्यांची समोरासमोर टक्कर होते. मात्र त्यामुळे कधीही कोणाचेही नुकसान झालेले नाही. प्राणी मात्रांमध्ये एकमेकाशी टक्कर देणे हा स्वाभाविक गुणधर्म आहे. त्यामुळे त्याच्याशी कोणाचाही संबंध जोडणे चुुकीचे आहे. मग तो ठग्गर असो, बकरा असो किंवा अन्य प्राणी असो, असे कुरी म्हणतात.

मेंढेपालनाचे नियम

एका वर्षात दुधाचे दात येतात
दोन दात आल्यानंतर आक्रमक.
चार दातानंतर शर्यतीत भाग घेतो.
20 महिन्यानंतर खर्‍या अर्थाने आक्रमक.
25 ते 6 महिन्यापर्यंत सदृढ होऊन कोणालाही ठोकर मारू शकतो.
तीन वर्षात 8 दात येऊ शकतात.
किमान 7 ते 8 वर्षापयर्ंत लढतीत सहभाग. 
तांदूळ देणे धोकादायक
तूरडाळ, ज्वारी, बाजरी, कापसी देण्याबरोबरच दैनंदिन पाणी देणे गरजेचे.

Tags : Belgaon, Belgaon News, Sheep Race,