Thu, Feb 20, 2020 16:35होमपेज › Belgaon › शंकर यांना मंत्री बनवणारच : येडि

शंकर यांना मंत्री बनवणारच : येडि

Last Updated: Nov 16 2019 11:31PM
बंगळूर : प्रतिनिधी 

अपक्ष आमदार आणि मंत्रिपदी असलेल्या आर. शंकर यांनी भाजप सरकारसाठी राजीनामा दिला आहे. ते सध्या राणेबेन्‍नूर येथील भाजप आमदाराच्या प्रचारात आहेत. त्यांनी आपल्या पदाचा त्याग केला आहे. त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर निवडून आणून मंत्री बनवण्यात येणारच, असा दावा मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी केला आहे.

काँग्रेस?निजद सरकारमध्ये अपक्ष आमदार आर. शंकर हे मंत्री होते. पण आपल्या पदाचा राजीनामा देत त्यांनी अपात्र आमदारांसोबत जाण्याचे पसंत केले होते. आता त्यांच्या मतदारसंघात अरुणकुमार गुत्तल यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शंकर यांच्या मंत्रिपदाचे काय होणार, अशी विचारणा करण्यात येत होती. त्यावर येडियुराप्पा यांनी, शंकर यांच्याशी आपले बोलणे झाले असून ते सध्या भाजप उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करत आहेत. निवडणुकीनंतर त्यांना विधान परिषदेवर निवडून आणून मंत्रिपद देण्यात येणार आहे, असे सांगितले.