Wed, Sep 23, 2020 21:13होमपेज › Belgaon › शाळकरी मुलीची वडगावात आत्महत्या 

शाळकरी मुलीची वडगावात आत्महत्या 

Published On: Feb 15 2019 1:46AM | Last Updated: Feb 14 2019 11:21PM
बेळगाव : प्रतिनिधी

शाळकरी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना  गुरूवारी सायंकाळी उघडकीस आली. वझे गल्ली वडगाव येथे घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे निश्‍चित कारण समजू शकले नाही. 

सायंकाळी शाळा सुटल्यानंतर सदर युवती तिचे वडील काम करत असलेल्या नाझर कॅम्प वडगाव येथे गेली. तेथून घराची चावी घेऊन ती घरी आली. शाळेचा गणवेश बदलून तिने घरातील नेहमीचे कपडे घातले. यानंतर  तिने घरातील हुकाला ओढणीने गळफास घेतला. 

तिचा धाकटा भाऊ जेव्हा घरी आला तेव्हा आतून कडी होती. त्याने खिडकी उघडून पाहिली तेव्हा त्याला बहिणीने गळफास घेतल्याचे आढळून आले. शहापूरचे पोलिस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तिचे वडील विणकर कामगार असून, येथीलच एका स्कूलमध्ये ती शित होती.