Tue, Oct 20, 2020 12:23होमपेज › Belgaon › शाळांचा निर्णय नोव्हेंबरमध्ये

शाळांचा निर्णय नोव्हेंबरमध्ये

Last Updated: Oct 19 2020 1:22AM
बंगळूर : पुढारी वृत्तसेवा

नोव्हेेंबर महिन्यामध्ये टप्प्याटप्याने शाळा-महाविद्यालये सुरू करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री अश्‍वथ नारायण यांनी कळविले आहे.  तीन टप्प्यामध्ये शाळा-महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहे. यासाठी तज्ज्ञांशी चर्चा केली जाणार आहे. त्यानंतरच शाळा - महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, यासाठी मार्गसूची जारी करण्यात येणार आहे. याचे पालन करणे सक्‍तीचे  करण्यात येणार आहे. यानंतरच निर्णय घेण्यात येईल, असे अश्‍वथ नारायण यांनी सांगितले. 

पहिल्या टप्प्यात पदवी आणि पदव्युत्तर महाविद्यालये सुरू करण्यात येतील. दुसर्‍या टप्प्यामध्ये इयत्ता 8 वी ते 12 वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येतील, तर तिसर्‍या टप्प्यामध्ये इयत्ता पहिली ते सातवीपयर्र्ंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. मात्र तत्पूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येणार आहे. तज्ज्ञ व पालकांशी चर्चा करूनच सरकार पुढील निर्णय घेईल. नोव्हेंबरमध्ये शाळा - महाविद्यालये सुरू करण्यात येणार असली तरी केंद्र सरकारकडून जारी करण्यात येणार्‍या मार्गसूचीचेही पालन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

एलकेजी सुरू करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा -महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असे त्यांनी सांगितले.

नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात निर्णय शक्य

शाळा व महाविद्यालये  सुरू करण्याचा निर्णय नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात होण्याची दाट शक्यता उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्‍त केली आहे. यासाठी पूर्ण खबरदारी घेऊन युजीसीच्या मार्गसूची व सल्ल्याचे पालन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

 "